POCO चा सर्वात Beautiful स्मार्टफोन येतोय; पाहून तुम्हीही म्हणाल 'जबरदस्त'!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2022 02:29 PM2022-09-01T14:29:57+5:302022-09-01T14:33:10+5:30

POCO : रिपोर्टमध्ये म्हटले आहे की,  POCO M5 4GB + 64GB आणि 4GB + 128GB कॉन्फिगरेशनमध्ये उपलब्ध असेल.

poco m5 series pricing renders and variants leaked ahead of launch check all details | POCO चा सर्वात Beautiful स्मार्टफोन येतोय; पाहून तुम्हीही म्हणाल 'जबरदस्त'!

POCO चा सर्वात Beautiful स्मार्टफोन येतोय; पाहून तुम्हीही म्हणाल 'जबरदस्त'!

Next

नवी दिल्ली : POCO, POCO M5 सिरीजच्या ग्लोबल लाँचसाठी तयारी करत आहे. यासाठी 5 सप्टेंबरला एक इव्हेंट नियोजित करण्यात आला आहे. या इव्हेंटमध्ये POCO M5 आणि POCO M5s लाँच करण्यात येतील. दरम्यान, लाँचिंगपूर्वी एक नवीन रिपोर्ट समोर आला आहे, ज्यामध्ये रेंडर, स्टोरेज व्हेरिएंट आणि डिव्हाइसच्या किंमतीबाबत खुलासा करण्यात आला आहे. POCO चा स्मार्टफोन पाहून तुम्हीही 'जबरदस्त' म्हणाल.

POCO M5 Renders Leak
POCO M5 च्या रेंडर्सनुसार, डिव्हाइस ब्लॅक, येल्लो आणि ग्रीन कलरच्या ऑप्शनमध्ये उपलब्ध असणार आहे. दुसरीकडे, POCO M5s ब्लॅक, ब्लू आणि व्हाइट कलर ऑप्शनमध्ये दिसणार आहे. ब्रँडने आधीच पुष्टी केली आहे की, व्हॅनिला M5 MediaTek Helio G99 चिपसेट आणि 90Hz डिस्प्लेसह येईल. दरम्यान, M5s हे रीब्रँड केलेले Redmi Note 10S असेल, अशी चर्चा सुरू आहे.

POCO M5 Price In India
रिपोर्टमध्ये म्हटले आहे की,  POCO M5 4GB + 64GB आणि 4GB + 128GB कॉन्फिगरेशनमध्ये उपलब्ध असेल. आधीची किंमत EUR 189 (जवळपास 15 हजार रुपये)  असण्याची शक्यता आहे. तर नंतरची किंमत EUR 209 (16,616 रुपये) असू शकते. दुसरीकडे, POCO M5s,EUR 229 (18,206 रुपये) आणि EUR 249 (19,796 रुपये) साठी  4GB+64GB आणि 4GB+128GB कॉन्फिगरेशनमध्ये असतील.

POCO M5

POCO M5 specifications
POCO M5 MediaTek Helio G99 चिपसेट आणि FHD+ रिझोल्यूशनसह 6.58-इंच LDC डिस्प्लेसह येईल. 33W फास्ट चार्जिंगसह 5,000mAh बॅटरी देखील मिळण्याची शक्यता आहे. सुरक्षेसाठी यात साइड-फेसिंग फिंगरप्रिंट सेन्सर असू शकतो आणि कदाचित Android 12 वर आधारित MIUI 13 चालेल. याबाबत सविस्तर माहिती अद्याप समोर आली नाही.

POCO M5s Specifications
दरम्यान, POCO M5s हा खरंतर रीब्रँड केलेला Redmi Note 10S आहे, यात 6.43-इंचाचा FHD+ AMOLED डिस्प्ले असेल. हुड अंतर्गत, Helio G96 SoC ला LPDDR4x RAM आणि UFS 2.2 स्टोरेजद्वारे पूरक असण्याची अपेक्षा करू शकतो. ऑप्टिक्ससाठी, डिव्हाइसमध्ये 64MP प्राइमरी, 8MP अल्ट्रा-वाइड, 2MP मॅक्रो आणि 2MP डेप्थ सेन्सरचा बनलेला क्वाड-कॅमेरा सेटअप असणार आहे. याचबरोबर, फ्रंटला 13 MP सेल्फी कॅमेरा मिळेल. इतर फीचर्समध्ये ड्युअल स्टीरिओ स्पीकर, 3.5 मिमी हेडफोन जॅक, मायक्रो एसडी कार्ड स्लॉट, साइड-माउंट फिंगरप्रिंट सेन्सर, एक IP53 रेटिंग, 5,000mAh बॅटरी आणि 33W जलद चार्जिंग सपोर्टचा समावेश असू शकते.

Web Title: poco m5 series pricing renders and variants leaked ahead of launch check all details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.