256GB मेमरीसह शानदार पोको एक्स4 जीटी घेऊ शकतो एंट्री; वेबसाईटवर लाँचपूर्वीच लिस्टिंग
By सिद्धेश जाधव | Published: June 11, 2022 04:10 PM2022-06-11T16:10:23+5:302022-06-11T16:10:31+5:30
पोको एक्स4 जीटी लवकरच भारतात लाँच होणार आहे. फोनला NBTC सर्टिफिकेशन मिळालं आहे.
पोकोची एक्स सीरिज खूप लोकप्रिय ठरली आहे. कंपनीनं आता या सीरिजचा विस्तार करण्याची तयारी सुरु केली आहे. लवकरच भारतीय बाजारात पोको एक्स4 जीटी स्मार्टफोन लाँच केला जाऊ शकतो. काही दिवसांपूर्वी हा हँडसेट बीआयएस सर्टिफिकेशन्स साईटवर 22041216I मॉडेलनंबरसह दिसला होता. तर आता एनबीटीसीच्या सर्टिफिकेशनवरून पोको एक्स4 जीटी या नावाची आणि 22041216G या मॉडेल नंबरची पुष्टी झाली आहे.
काही दिवसांपूर्वी Redmi Note 11T Pro आणि Note 11T Pro+ चीनमध्ये लाँच केला गेला आहे. भारतासह अन्य बाजारपेठांमध्ये हे फोन्स पोको ब्रॅंडिंग अंतर्गत विकले जाऊ शकतात. Redmi Note 11T Pro चा रीब्रँडेड मॉडेल पोको एक्स4 जीटी असू शकतो. टिपस्टर Abhishek Yadav नं आपल्या ट्विटर अकाऊंटवरून पोको एक्स4 जीटीच्या NBTC सर्टिफिकेशनची माहिती आणि काही स्पेसिफिकेशन सांगितले आहेत. परंतु लाँच डेटची माहिती मात्र सांगितली नाही.
Redmi Note 11T Pro चे स्पेसिफिकेशन्स
Redmi Note 11T Pro फोनमध्ये 67 वॉट फास्ट चार्ज सपोर्टसह 5080mAh ची बॅटरी आहे. प्रोसेसिंगसाठी यात मीडियाटेकचा डिमेन्सिटी 8100 चिपसेट मिळतो. सोबत 8GB पर्यंत RAM आणि 256GB पर्यंतची स्टोरेज मिळते. सिक्योरिटीसाठी फोनमध्ये साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर मिळतो.
फोनमध्ये 6.6 इंचाचा फुल-एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 144 हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. फोन डॉल्बी व्हिजन आणि डीसी डिमिंग सपोर्टसह बाजारात आला आहे. बॅक पॅनलवर ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. ज्यात 64 मेगापिक्सलचा ISOCELL GW1 प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे. त्याचबरोबर 8 मेगापिक्सलची अल्ट्रा-वाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर आहे. सेल्फीसाठी फोनच्या फ्रंटला 20 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे.