11GB रॅम असलेला दमदार 5G स्मार्टफोन आला भारतात; फीचर्स पाहून रेडमी-रियलमीला फुटला घाम
By सिद्धेश जाधव | Published: March 28, 2022 03:37 PM2022-03-28T15:37:01+5:302022-03-28T15:38:08+5:30
Poco X4 Pro 5G स्मार्टफोन भारतात 11GB RAM, 5000mAh बॅटरी, 64MP कॅमेरा आणि 120Hz रिफ्रेश रेटसह लाँच झाला आहे.
Poco X4 Pro 5G स्मार्टफोननं भारतातील मिड रेंज सेगमेंटमध्ये एंट्री घेतली आहे. आधीच या सेगमेंटमध्ये रेडमी, रियलमी, मोटोरोला, आयकू आणि सॅमसंगची गर्दी आहे त्यात आता पोकोची भर पडली आहे. कंपनीनं हा फोन 11GB RAM, 5000mAh बॅटरी, 64MP कॅमेरा, 67W फास्ट चार्जिंग आणि 120Hz रिफ्रेश रेटसह सादर केला आहे. चला जाणून घेऊया Poco X4 Pro 5G ची संपूर्ण माहिती.
Poco X4 Pro 5G चे स्पेसिफिकेशन्स
फोनमध्ये कंपनीनं 6.67 इंचाच्या फुल एचडी+ सुपर अॅमोलेड डिस्प्लेचा वापर केला आहे. हा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेट आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 च्या सुरक्षेसह बाजारात आला आहे. या मोबाईलमध्ये अँड्रॉइड 11 आधारित MIUI 13 देण्यात आला आहे. प्रोसेसरसाठी यात स्नॅपड्रॅगन 695 चिपसेट देण्यात आला आहे. पोकोच्या या नव्या स्मार्टफोनमध्ये 8 जीबी पर्यंत रॅम आणि 256 जीबी पर्यंतची इंटरनल स्टोरेज मिळते. टर्बो रॅम फिचरच्या मदतीनं 11GB पर्यंत रॅम वाढवता येईल.
फोटोग्राफीसाठी Poco X4 Pro 5G मध्ये एलईडी फ्लॅशसह ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 64 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, 8 मेगापिक्सलची अल्ट्रा-वाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आहे. सेल्फीसाठी 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो. या पोको फोनमधील 5000mAh ची बॅटरी 67 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. जी फक्त 15 मिनिटांत फोन 50 टक्के चार्ज करू शकते.
Poco X4 Pro 5G ची किंमत
Poco X4 Pro 5G चे तीन व्हेरिएंट भारतात आले आहेत. 18,999 रुपयांमध्ये या फोनचा 6GB RAM आणि 64GB स्टोरेज व्हेरिएंट मिळेल. 6GB RAM आणि 128GB स्टोरेज मॉडेलची किंमत 19,999 रुपये आहे. 8GB RAM आणि 128GB स्टोरेज मॉडेलसाठी 21,999 रुपये मोजावे लागतील. हा फोन लेजर ब्लू, पोको येलो आणि लेजर ब्लॅक रंगात 5 एप्रिलपासून Flipkart वर उपलब्ध होईल.