Portable AC: ACचा आनंद घ्या अवघ्या ५०० रुपयात, ग्लासभर पाण्यात मिळेल गारवा, वीजबिलही नगण्य
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2023 03:59 PM2023-04-03T15:59:00+5:302023-04-03T16:23:51+5:30
Portable AC Price : मार्केटमध्ये एक दमदार एसी आला आहे. तो आतापर्यंतच्या कुठल्याही एअर कंडिशनरपेक्षा आकारामध्ये खूप लहान आहे. जाणून घेऊयात या पोर्टेबल एअर कंडिशनबाबत.
उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे. दुपारचं तापमान वाढू लागलं आहे. घरामध्ये पंखे, एसी आणि कूलर सुरू झाले आहेत. मात्र प्रत्येक ठिकाणी थंड हवा मिळणं कठीण असतं. किचनमधील काम असेल किंवा घरातला कुठलाही कोपरा, तिथे हवा मिळणं कठीण असतं. आता मार्केटमध्ये एक दमदार एसी आला आहे. तो आतापर्यंतच्या कुठल्याही एअर कंडिशनरपेक्षा आकारामध्ये खूप लहान आहे. जाणून घेऊयात या पोर्टेबल एअर कंडिशनबाबत.
जर तुम्ही कमी विजेच्या वापरामध्ये अधिक हवा देणाऱ्या पोर्टेबल कुलिंग डिव्हाइसचा शोध घेत असाल तर हा पोर्टेबल कूलिंग एसी चांगला पर्याय ठरू शकतो. कमी किंमत असलेला हा पोर्टेबल मिनी कूलर काही मिनिटांमध्येच खोलीला थंड करू शकतो. आज आम्ही तुम्हाला या स्वस्त आणि जबरदस्त पोर्टेबल कुलरबाबत माहिती देणार आहोत.
अभ्यास करताना किंवा काम करताना हा मिनी एसी उत्तम पर्याय ठरू शकतो. हा एसी ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्हीकडून खरेदी करता येऊ शकतो. या एसीची किंमत ५०० रुपयांपासून सुरू होते. तसेच त्याची कमाल किंमत ही २ हजार रुपये एवढी आहे. वेगवेगळ्या डिझाइनमधून हा एसी खरेदी करता येऊ शकतो. हा एसी वेगवेगळ्या डिझाइन आणि शेपमध्ये खरेदी करता येतो.
या एसीसाठी तुम्ही ड्राय आइस किंवा पाण्याचा वापर करू शकता. त्या माध्यमातून हा कुलिंग देतो. स्टडी टेबल किंवा ऑफिस टेबलवर काम करणाऱ्यांसाठी हा उत्तम डिव्हाइस ठरू शकतो.