Wifi राऊटरला जोडा हे छोटं उपकरण, लाईट गेली तर दणक्यात चालेल इंटरनेट
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2022 10:59 PM2022-10-31T22:59:50+5:302022-10-31T23:00:38+5:30
Portable Inverter For Wifi Router: भारतीय मार्केटमध्ये आता वायफायला अनेक तास अॅक्टिव्ह ठेवणारा पोर्टेबल इंटरनेट आला आहे. हा इन्व्हर्टर एवढा लहान आहे की, त्याच्या आकार छोट्या राऊटर एवढाच असतो.
भारतीय मार्केटमध्ये आता वायफायला अनेक तास अॅक्टिव्ह ठेवणारा पोर्टेबल इंटरनेट आला आहे. हा इन्व्हर्टर एवढा लहान आहे की, त्याच्या आकार छोट्या राऊटर एवढाच असतो. जर तुम्हीही घरात्याला त असलेल्या वायफाय राऊटरसाठी वापरू इच्छित असाल तर तुमच्यासाठी तो चांगला पर्याय ठरू शकतो. आज आम्ही तुम्हाला हा पोर्टेबल इन्व्हर्टर आणि त्याच्या वैशिष्ट्यांबाबत माहिती देणार आहोत.
आम्ही ज्या इन्व्हर्टरबाबत सांगत आहोत त्याचं नाव Oakter Mini UPS for 12V WiFi Router Broadband Modem असं आहे. हा इन्व्हर्टर अॅमेझॉनवर उपलब्ध आहे. हा इन्व्हर्टर तुम्हाला पॉवर सप्लाय करण्याचं काम करतो. हा इन्व्हर्टर आकाराने खूपच लहान आहे. तसेच तो चार तासांपर्यंत तुम्हाला सातत्याने पॉवर सप्लाय देऊ शकतो. जर तुमच्या घरामध्ये वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याची समस्या असेल तर हा डिव्हाइस तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. सर्वसाधारणपणे लोक आपल्या डेस्कटॉपसाठी यूपीएसचा वापर करतात. मात्र आता तुमच्या वायफायसाठीसुद्धा तो उपलब्ध असेल. तसेच अगदी किफायतशीर किमतीत तुम्ही तो खरेदी करू शकता.
याच्या किमतीबाबत बोलायचे झाल्यास याची किंमत कुठल्याही स्वस्त पॉवर बँकएवढीच आहे. जर तुम्ही तो खरेदी करू इच्छित असाल तर त्यासाठी तुम्हाला ११७४ रुपये मोजावे लागतील. एक यूपीएसच्या हिशेबाने ही किंमत अधिक नाही आहे. कारण त्याची खरी किंमत ३ हजार ४९० रुपये असून तो तुम्हाला ६६ टक्के सवलतीच्या दरात मिळत आहे.