हा स्वस्त स्पीकर वाढवेल तुमच्या रोड ट्रिपची शान; पाणी पडल्यावर देखील दमदार आवाज
By सिद्धेश जाधव | Published: June 17, 2022 03:59 PM2022-06-17T15:59:45+5:302022-06-17T16:00:30+5:30
boAt Stone 135 नावाचा ब्लूटूथ स्पिकर कंपनीनं भारतात सादर केला आहे.
boAtचे ब्लूटूथ स्पिकर भारतात खूप लोकप्रिय आहेत. कमी किंमतीत दमदार आवाज आणि शानदार फीचर्समुळे भारतीय या ब्रँडला पसंती देतात. आता कंपनीनं आपल्या ब्लूटूथ स्पिकरच्या पोर्टफोलियोमध्ये नव्या डिवाइसची भर टाकली आहे. boAt Stone 135 नावाचा नवा पोर्टेबल ब्लूटूथ स्पिकर लाँच झाला आहे. चला जाणून घेऊया याची किंमत आणि फीचर्स.
boAt Stone 135 ची किंमत
boAt Stone 135 ची किंमत 799 रुपये ठेवण्यात आली आहे. या किफायतशीर किंमतीत तुम्ही ब्लॅक, बोल्ड ब्लू, सोल्जर ग्रीन आणि स्पेस ग्रे कलर व्हेरिएंटची निवड करू शकता. कंपनीच्या लाईफस्टाईल स्टोरसह boAt Stone 135 ची विक्री ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon India वरून देखील केली जाईल.
boAt Stone 135 चे स्पेसिफिकेशन
boAt Stone 135 एक 5W पोर्टेबल स्पिकर आहे, ज्यात कनेक्टिव्हिटीसाठी ब्लूटूथ 5.0 टेक्नॉलॉजी मिळते. या स्पीकरची रेंज 10 मीटर पर्यंत आहे. स्पिकरला IPX4 सर्टिफिकेट मिळालं आहे, जे वॉटर रेजिस्टन्स क्षमता दर्शवतं. हा पोर्टेबल स्पिकर 80% वॉल्यूमवर 11 तासांपर्यंतचा प्लेटाइम देऊ शकतो. बॅटरी चार्ज करण्यासाठी मायक्रो यूएसबी पोर्ट देण्यात आला आहे.
या पोर्टेबल स्पिकरमध्ये एक TF कार्ड स्लॉट देण्यात आला आहे, ज्याचा वापर करून युजर्स मायक्रोएसडी कार्डवरील संगीत थेट ऐकू शकतात. तसेच FM रेडियो देखील या स्पिकरच्या माध्यमातून ऐकता येईल. boAt Stone 135 मध्ये TWS सपोर्ट देखील देण्यात आला आहे. त्यामुळे दुसऱ्या स्पिकरशी हा कनेक्ट करता येतो, म्हणजे जास्त स्पष्ट आणि मोठा आवाज मिळेल.