आता इंटरनेटशिवाय मोबाईलवर पाहता येणार टीव्ही; जाणून घ्या काय आहे D2M सुविधा आणि कधी सुरू होणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2022 04:01 PM2022-12-12T16:01:23+5:302022-12-12T16:01:55+5:30

दूरसंचार अभियांत्रिकी केंद्राने यासंदर्भात एक मसुदा जारी केला आहे.

possible to watch tv on mobile without internet modi govt is making standards | आता इंटरनेटशिवाय मोबाईलवर पाहता येणार टीव्ही; जाणून घ्या काय आहे D2M सुविधा आणि कधी सुरू होणार?

आता इंटरनेटशिवाय मोबाईलवर पाहता येणार टीव्ही; जाणून घ्या काय आहे D2M सुविधा आणि कधी सुरू होणार?

Next

नवी दिल्ली : आता इंटरनेटशिवाय मोबाईलवर टीव्ही पाहणे शक्य होणार आहे. कारण, सरकार डायरेक्ट-टू-मोबाईल (D2M) सुविधेसाठी काम करत आहे. सीएनबीसीच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, सरकार यासाठी एक स्टँडर्ड बनवत आहे, जेणेकरून फ्री-टू-एअर चॅनेल मोबाईलवर चालतील आणि वाय-फाय अँटेना म्हणून काम करतील. हा सराव पूर्ण करण्यासाठी कंपन्यांना यासाठी मिडिल विअर लावावा लागणार आहे. दूरसंचार अभियांत्रिकी केंद्राने यासंदर्भात एक मसुदा जारी केला आहे.

दरम्यान, डायरेक्ट-टू-मोबाईल (D2M) ब्रॉडकास्टसाठी योजना तयार केल्या जात आहेत. अलीकडेच माहिती आणि प्रसारण सचिव अपूर्व चंद्रा यांनी सांगितले होते की, डायरेक्ट-टू-मोबाईल ब्रॉडकास्टिंगवर एक पायलट प्रोजेक्टची स्टडी लवकरच दिल्ली-एनसीआरमध्ये सुरू केली जाईल, ज्यामध्ये टेलिव्हिजनची पोहोच अनेक पटींनी वाढवण्याची क्षमता आहे.

अपूर्व चंद्रा म्हणाले, "सध्या देशात जवळपास 20 कोटी टेलिव्हिजन घरे आहेत. भारतात 60 कोटीहून अधिक स्मार्टफोन युजर्स आणि 80 कोटी ब्रॉडबँड युजर्स आहेत. त्यामुळे टेलिव्हिजन मीडियाची पोहोच खूप अधिक असली पाहिजे. या संदर्भात आयआयटी-कानपूर आणि सांख्य लॅब्सने बंगळुरूमध्ये डायरेक्ट-टू-मोबाईल ब्रॉडकास्टिंगवर एक पायलट प्रोजेक्टची स्टडी केली आहे आणि आता ते नोएडा किंवा दिल्लीजवळ स्टडी सुरू करत आहेत."

काय आहे डायरेक्ट-टू-मोबाईल ब्रॉडकास्टिंग?
जसे डीटीएच आहे, तसेच डीटूएम आहे. या सुविधेमुळे तुम्ही आता तुमच्या स्मार्टफोनवर इंटरनेट कनेक्शनशिवाय टीव्ही पाहू शकणार आहात. ही सुविधा एफएम रेडिओसारखी काम करेल. ज्यामध्ये गॅझेटमध्ये तयार केलेला रिसीव्हर रेडिओ फ्रिक्वेन्सीमध्ये प्रवेश करू शकतो. ब्रॉडबँड आणि ब्रॉडकास्ट टेक्नॉलीजी एकत्रित केल्या आहेत, ज्या मोबाईल फोनला स्थानिक डिजिटल टीव्ही फीड्स प्राप्त करण्यास सक्षम करतात, ज्यामुळे मल्टीमीडिया कन्टेन्ट थेट स्मार्टफोनवर प्रसारित केली जाऊ शकतो.

Web Title: possible to watch tv on mobile without internet modi govt is making standards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.