पावरफुल Honor Magic 3 सीरिज लाँच; फ्लॅगशिप प्रोसेसरसह तीन स्मार्टफोन सादर 

By सिद्धेश जाधव | Published: August 13, 2021 02:58 PM2021-08-13T14:58:48+5:302021-08-13T15:24:11+5:30

Magic 3 Series launch: टॉप एन्ड स्मार्टफोन Magic 3 Pro+ मध्ये कंपनीने क्वॉलकॉमची लेटेस्ट Snapdragon 888+ SoC दिली आहे. या तिन्ही स्मार्टफोन्सचे स्पेसिफिकेशन्स एकसारखे आहेत.  

Powerful Honor Magic 3 Series Launch; Introducing three smartphones with flagship processor | पावरफुल Honor Magic 3 सीरिज लाँच; फ्लॅगशिप प्रोसेसरसह तीन स्मार्टफोन सादर 

पावरफुल Honor Magic 3 सीरिज लाँच; फ्लॅगशिप प्रोसेसरसह तीन स्मार्टफोन सादर 

googlenewsNext
ठळक मुद्देHONOR Magic 3 Pro च्या बॅक पॅनलवर क्वॉड कॅमेरा सेटअप मिळतो.HONOR Magic 3 सीरीज चीनमध्ये प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध झाली आहेहे तिन्ही ऑनर स्मार्टफोन Android 11 आधारित Magic UI 5.0 वर चालतात.

Honor ने चीनमध्ये आपली नवीन फ्लॅगशिप Honor Magic 3 सीरीज लाँच केली आहे. या सीरिजमध्ये Honor Magic 3, Magic 3 Pro, आणि Magic 3 Pro+ असे तीन स्मार्टफोन लाँच करण्यात आले आहेत. यातील टॉप एन्ड स्मार्टफोन Magic 3 Pro+ मध्ये कंपनीने क्वॉलकॉमची लेटेस्ट Snapdragon 888+ SoC दिली आहे. तर सीरिजमधील इतर दोन स्मार्टफोन्स Snapdragon 888 SoC सह सादर करण्यात आले आहेत. प्रोसेसर आणि कॅमेरा सेटअप वगळता या तिन्ही स्मार्टफोन्सचे स्पेसिफिकेशन्स एकसारखे आहेत.  

Honor Magic 3 सीरीज स्पेसिफिकेशन्स 

Honor Magic 3 सीरीजमधील Magic 3, Magic 3 Pro आणि Magic 3 Pro+ या इन तिन्ही मध्ये 6.76-इंचाचा ओएलईडी डिस्प्ले देण्यात आला आहे. हा एक फुल एचडी+ रिजोल्यूशन असलेल डिस्प्ले आहे, जो 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. वर सांगितल्याप्रमाणे Honor Magic 3 सीरिजमधील प्रो प्लस मॉडेलमध्ये Snapdragon 888+ चिपसेट मिळतो आणि इतर दोन मॉडेल्समध्ये Snapdragon 888 SoC देण्यात आली आहे.  

हे तिन्ही ऑनर स्मार्टफोन Android 11 आधारित Magic UI 5.0 वर चालतात. कनेक्टिव्हिटीसाठी या स्मार्टफोनमध्ये ड्युअल-SIM, 5G, WiFi 6, Bluetooth 5.2, NFC, आणि USB Type-C पोर्ट देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमधील 4,600mAh ची बॅटरी आणि 66W वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. 

HONOR Magic 3 सीरिजचे कॅमेरा स्पेसिफिकेशन्स 

कॅमेरा सेगमेंटमधून या सीरिजमधील तिन्ही फोनमध्ये फरक दिसू लागतो. तिन्ही फोन 13MP च्या फ्रंट कामेरील सपोर्ट करतात. परंतु Pro आणि Pro Plus स्मार्टफोनमध्ये फेस ऑथेंटिकेशनसाठी 3D कॅमेरा देण्यात आला आहे.  

HONOR Magic 3 च्या रियर ट्रिपल कॅमेरा सेटअपमध्ये 50 मेगापिक्सलचा 1/1.56 इंच वाईड सेन्सर, 13 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड अँगल सेन्सर आणि 64 मेगापिक्सलचा मोनोक्रोम सेन्सर देण्यात आला आहे.  

HONOR Magic 3 Pro च्या बॅक पॅनलवर क्वॉड कॅमेरा सेटअप मिळतो. यात 50 मेगापिक्सलचा 1/1.56 इंच वाईड सेन्सर, 13 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड सेन्सर, 64 मेगापिक्सल मोनोक्रोम सेन्सर आणि 64 मेगापिक्सलच्या सेन्सरचा समावेश आहे जो 3.5x ऑप्टिकल झूमला सपोर्ट करतो. सोबत एक 8×8 dTOF लेजर फोकिंग सिस्टम देण्यात आली आहे.  

HONOR Magic 3 Pro+ च्या मागे देखील क्वॉड कॅमेरा सेटअप कंपनीने दिला आहे. ज्यात 50 मेगापिक्सलचा 1/1.28 इंच वाईड सेन्सर, 64 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड अँगल सेन्सर, 64 मेगापिक्सलचा मोनोक्रोम सेन्सर आणि 64 मेगापिक्सलचा सेन्सर 3.5x ऑप्टिकल झूमसह देण्यात आला आहे. त्याचबरोबर 8×8 dTOF लेजर फोकिंग सिस्टम देण्यात आली आहे.  

HONOR Magic 3 सीरीजची किंमत 

HONOR Magic 3  

  • 8GB रॅम + 128GB स्टोरेज – 4,599 युआन (सुमारे 52,700 रुपये) 
  • 8GB रॅम + 256GB स्टोरेज – 4,999 युआन (सुमारे 57,300 रुपये) 

HONOR Magic 3 Pro  

  • 8GB रॅम + 256GB स्टोरेज – 5,999 युआन (सुमारे 68,700 रुपये) 
  • 12GB रॅम + 512GB स्टोरेज – 6,799 युआन (सुमारे 77,900 रुपये) 

HONOR Magic3 Pro +  

  • 12GB रॅम + 512GB स्टोरेज – 7,999 युआन (सुमारे 91,600 रुपये) 

HONOR Magic 3 सीरीज चीनमध्ये प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध झाली आहे आणि 20 ऑगस्टपासून हे स्मार्टफोन खरेदीसाठी उपलब्ध होतील. हे फोन भारतासह जगभरात कधी उपलब्ध होतील याची माहिती मात्र कंपनीने दिलेली नाही.  

Web Title: Powerful Honor Magic 3 Series Launch; Introducing three smartphones with flagship processor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.