ऑनलाईन खरेदी करताना फसवणूक टाळण्यासाठी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी? जाणून घ्या

By सिद्धेश जाधव | Published: October 4, 2021 06:46 PM2021-10-04T18:46:57+5:302021-10-04T18:47:09+5:30

Amazon, Flipkart तसेच इतर अनेक ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरून खरेदी करताना फसवणूक होऊ नये यासाठी पुढील गोष्टींची काळजी घ्या.  

precautions to be taken during online shopping on flipkart and amazon | ऑनलाईन खरेदी करताना फसवणूक टाळण्यासाठी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी? जाणून घ्या

ऑनलाईन खरेदी करताना फसवणूक टाळण्यासाठी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी? जाणून घ्या

googlenewsNext

अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्टने आपल्या फेस्टिवल सीजनची सुरुवात केली आहे. या सेलमध्ये अनेक आकर्षक ऑफर्स आणि डिल्स दिल्या जात आहेत. त्यामुळे खरेदीचा मोह आवरता येत नाही. अशावेळी युजर्स घाईत वस्तू विकत घेतात आणि काही महत्वाच्या गोष्टींकडे लक्ष द्यायचे राहून जाते. सध्याच्या ऑनलाईन विश्वात छोटीशी चूक देखील तुमचे बँक अकॉउंट रिकामे करू शकते. म्हणून पुढे आम्ही काही अशा टिप्स दिल्या आहेत ज्या ऑनलाईन शॉपिंग करताना फसवणूक टाळण्यासाठी आवश्यक आहेत.  

ऑनलाईन शॉपिंग करताना या गोष्टींची काळजी घ्या 

सेलरची देखील रेटिंग आणि माहिती बघून घ्या 

ऑनलाइन शॉपिंगमध्ये एकाच प्रोडक्टसाठी अनेक विक्रेते (सेलर) असतात. तुम्ही विक्रेत्यांची रेटिंग देखील बघू शकता. प्रोडक्टची रेटिंग तुम्हाला प्रोडक्ट कसे आहे हे सांगते तर सेलरची रेटिंग ते प्रोडक्ट तुमच्यापर्यंत कसे पोहोचेल किंवा योग्य किंमतीती पोहोचेल हे सांगते. तसेच कधी कधी जास्त किंमत असलेल्या सेलरला प्राधान्य दिले जाते. युजर्स सेलर बदलून कमी किंमतीत विकणाऱ्या विक्रेत्याकडून प्रोडक्ट विकत घेऊ शकतात.  

कार्डची माहिती सेव्ह करू नका 

बँक ऑफर्स मिळवण्यासाठी ग्राहक घाई घाईत कार्डचे डिटेल्स टाकतात. त्यांनतर समोर आलेल्या सेव्ह माय डिटेल्सवर क्लिक करतात. यामुळे तुमचे आर्थिक नुकसान होऊ शकते. त्यामुळे कितीही घाई असली तरी तुमचे डेबिट आणि क्रेडिट कार्ड डिटेल सेव्ह करू नका.  

किंमत आणि ऑफर्सवर लक्ष द्या  

सध्या फ्लिपकार्ट आणि अ‍ॅमेझॉन दोन्हीवर सेल सुरु आहे. त्यामुळे एखादी वस्तू विकत घेताना दोन्ही ठिकाणी त्या प्रोडक्टची किंमत बघा. तसेच इतर अनेक वेबसाईटची मदत घेऊन तुम्ही योग्य किंमतीत वस्तू मिळवू शकता.  

COD ला प्राधान्य द्या 

सेलमध्ये प्री पेड म्हणजे आधी पैसे देऊन सामान मागवल्यास ऑफर्स दिल्या जातात. अशावेळी जर तुमचे सामान तुमच्या पर्यंत पोहोचले नाही तर रिफंड मिळवण्यासाठी खूप प्रयत्न देखील करावे लागतात. ऑफरने किंमतीवर जास्त फरक पडत नसल्यास किंवा विश्वासू वेबसाईट नसल्यास कॅश ऑन डिलिव्हरीला प्राधान्य द्या. तसेच डिलिव्हरी बॉय समोर बॉक्स ओपन करावा किंवा बॉक्स ओपन करताना एखादा व्हिडीओ बनवावा. असे केल्यास तुमची फसवणूक झाल्यास तुमच्याकडे पुरावा राहू शकतो.  

Web Title: precautions to be taken during online shopping on flipkart and amazon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.