तंत्रज्ञानाची किमया! "रोबोटला चेहरा द्या अन् 1.5 कोटी घरी न्या"; 'या' कंपनीने दिली भन्नाट ऑफर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2023 04:03 PM2023-01-22T16:03:06+5:302023-01-22T16:04:26+5:30

रोबोटिक्स कंपनी तिच्या पुढील ह्युमनॉइड रोबोटसाठी मानवी चेहरा शोधत आहे.

promobot is offering heavy money for face registration | तंत्रज्ञानाची किमया! "रोबोटला चेहरा द्या अन् 1.5 कोटी घरी न्या"; 'या' कंपनीने दिली भन्नाट ऑफर

फोटो - झी न्यूज

Next

रोबोटला आपला चेहरा देणं थोडं विचित्र वाटेल, पण येत्या काळात ही काल्पनिक गोष्ट प्रत्यक्षात उतरणार आहे. प्रोमोबोट ही रोबोटिक्स कंपनी तिच्या पुढील ह्युमनॉइड रोबोटसाठी मानवी चेहरा शोधत आहे. जो चेहरा शांत दिसतो आणि लोकांना आकर्षित करतो. हा चेहरा 2023 पासून हॉटेल्स, शॉपिंग सेंटर्स आणि विमानतळांवर दिसणार्‍या ह्युमनॉइड रोबोट्सना दिला जाईल. हा एका प्रकल्पाचा भाग आहे ज्यासाठी कंपनी मोठी रक्कम देण्यासही तयार आहे.

प्रोमोबोट ही एक रोबोट उत्पादक कंपनी आहे ज्याचे मुख्यालय न्यूयॉर्कमध्ये आहे जे मानवासारखे रोबोट तयार करते. फिलाडेल्फिया-आधारित रोबोट मेकर मानवी चेहऱ्यांची नोंदणी करेल आणि त्यांचा वापर ह्युमनॉइड रोबोटचा चेहरा तयार करण्यासाठी करेल. ह्युमनॉइड रोबोट वापरण्यासाठी त्यांच्या चेहऱ्याची नोंदणी करणाऱ्या इच्छुक व्यक्तींना कंपनी $200,000, अंदाजे रु. 1.5 कोटी देईल. 

प्रोमोबोट कंपनी शॉपिंग मॉल्स, हॉटेल्स आणि इतर गर्दीच्या ठिकाणी सहाय्यक म्हणून रोबोट्सची रचना आणि विकास करत आहे.  ही गोष्ट काही लोकांना भीतीदायक वाटू शकते, परंतु कंपनीचा उद्देश लोकांना ओळखीचा चेहरा असलेला ह्युमनॉइड रोबोट देणे आहे जे त्यांना अशा सार्वजनिक ठिकाणी मदत करू शकेल. सध्या कंपनीचे रोबोट 43 देशांमध्ये वापरले जात आहेत. ही कंपनी अशा चेहऱ्यांच्या शोधात आहे, जे दिसायला दयाळू आणि मैत्रीपूर्ण असतील, लोकांनी त्यांच्या जवळ जायला घाबरू नये.

कंपनी सतत असा चेहरा शोधण्याचा प्रयत्न करत आहे. साधारणपणे जगभरात वापरल्या जाणार्‍या सर्व रोबोट्सच्या चेहऱ्यावर मानवी हावभाव तयार करता येत नाहीत, अशा परिस्थितीत मोठ्या प्रमाणात समानता ठेवण्यासाठी कंपनीला खर्‍या व्यक्तीचा चेहरा वापरायचा आहे आणि त्या बदल्यात कंपनी कोटयवधी रुपये खर्च करण्यासही तयार आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
 

Web Title: promobot is offering heavy money for face registration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.