20 दिवस चार्जिंगविना; परवडणाऱ्या किंमतीत झोप व हृदयावर लक्ष ठेवणारं ब्रँडेड Smartwatch 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2022 07:12 PM2022-06-03T19:12:51+5:302022-06-03T19:13:24+5:30

Ptron Force X10e नावाचं स्मार्टवॉच SpO2 सेन्सर, हार्ट रेट सेन्सर आणि फिमेल हेल्थ ट्रॅकरसह लाँच झालं आहे.  

Ptron force x10e smartwatch launch soon in india  | 20 दिवस चार्जिंगविना; परवडणाऱ्या किंमतीत झोप व हृदयावर लक्ष ठेवणारं ब्रँडेड Smartwatch 

20 दिवस चार्जिंगविना; परवडणाऱ्या किंमतीत झोप व हृदयावर लक्ष ठेवणारं ब्रँडेड Smartwatch 

googlenewsNext

PTron कंपनीचं नवीन स्मार्टवॉच Ptron Force X10E ऑनलाईन शॉपिंग साईट अ‍ॅमेझॉनवर लिस्ट करण्यात आलं आहे. त्यामुळे जेव्हा कंपनी हे घड्याळ सादर करेल तेव्हा याची विक्री देखील अ‍ॅमेझॉनच्या माध्यमातून केली जाईल. सध्या वॉचच्या बाय बटनच्या जागी Notify Me चा पर्याय देण्यात आला आहे. परंतु या लिस्टिंगमधून डिवाइसच्या स्पेक्स आणि फीचर्सची माहिती मिळाली आहे.  

स्पेसिफिकेशन्स  

Ptron Force X10e मध्ये 1.7 इंचाचा टचस्क्रीन आयताकृती डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्याचं रिजोल्यूशन 240x280 पिक्सल आहे. स्मार्टवॉचमध्ये एक क्राउन बटन आणि मेटल बॉडी देण्यात आली आहे. यातील 300+ क्लाउड-बेस्ड कस्टम वॉच फेस तुम्ही तुमच्या मूडनुसार बदलू शकता. तसेच एक चेंजेबल सिलिकॉन स्ट्रॅप देखील कंपनीनं दिला आहे.  

हेल्थ फीचर्स पाहता, हे घड्याळ तुमच्या हृदयावर 24 तास वॉच ठेऊ शकतं. तसेच यात रक्तातील ऑक्सिजन लेव्हल मोजण्यासाठी SpO2 सेन्सर देण्यात आला आहे. मेडिटेटिव ब्रीदिंग, स्लीप मॉनिटरिंग, सेडेंटरी अलर्ट, फीमेल हेल्थ-ट्रॅकिंग, स्पोर्ट्स अँड फिटनेस ट्रॅकिंग, स्टेप्स आणि कॅलरी काउंट सारखे इतर अनेक हेल्थ आणि स्पोर्ट्स फीचर्स देखील यात आहेत. कंपनीचा दावा आहे की, स्मार्टवॉचमध्ये 12 दिवसांचा बॅटरी बॅकअप आणि 20 दिवसांचा स्टँडबाय टाइम दिला जाईल. 

किंमत 

PTron Force X10e स्मार्टवॉचची किंमत भारतात 1,899 रुपये ठेवण्यात आली आहे. हे वॉच तुम्ही ब्लू, ब्लॅक आणि पिंक कलरमध्ये विकत घेऊ शकता. लवकरच याची सेल डेट देखील सांगण्यात येईल.  

Web Title: Ptron force x10e smartwatch launch soon in india 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.