PUBG Mobile 2 ची धडाक्यात एन्ट्री होणार; बंदी असूनही बिनदिक्कत खेळता येणार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2021 08:11 PM2021-02-24T20:11:57+5:302021-02-24T20:12:27+5:30

PUBG Mobile 2 Update claims: PUBG Mobile बनविणारी कंपनी Krafton या गेमच्या दुसऱ्या भागावर काम करत आहे. यामुळे PUBG Mobile 2 लवकरच लाँच होणार आहे.

PUBG Mobile 2 will launch soon; Indians can also play game because of cross platform, Claims | PUBG Mobile 2 ची धडाक्यात एन्ट्री होणार; बंदी असूनही बिनदिक्कत खेळता येणार

PUBG Mobile 2 ची धडाक्यात एन्ट्री होणार; बंदी असूनही बिनदिक्कत खेळता येणार

googlenewsNext

जगभरात PUBG Mobile कमालीचा लोकप्रिय आहे. भारतातही तरुणांमध्ये पब्जीची प्रचंड क्रेझ होती. परंतू चीनने गलवान खोऱ्यात भारतीय जवानांवर हल्ला केला आणि देशात चीनविरोधात वातावरण तापले. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने चीनच्या नाड्या आवळायला सुरुवात केली. चीनची शेकडो अॅप भारतातून पैसा कमावत होती. तसेच माहितीही चोरत होती. यामुळे मोदी सरकारने या अॅपवर बंदी आणली. 


PUBG Mobile बनविणारी कंपनी Krafton या गेमच्या दुसऱ्या भागावर काम करत आहे. यामुळे PUBG Mobile 2 लवकरच लाँच होणार आहे. PlayerIGN नावाच्या गेम्सच्या घडामोडींवर लक्ष ठेवणाऱ्या पोर्टलने याबाबतचे वृत्त दिले आहे. पब्जी पार्ट २ पुढील दोन आठवड्यांत लाँच होणार आहे, असे या पोर्टलने म्हटले आहे. तर याआधी काही वेबसाईटनी दिलेल्या माहितीनुसार पब्जी पार्ट २ जुलैमध्ये लाँच होणार होता. 

PUBG बॅन झाला म्हणून काय झाले? हे एकसो एक गेम आहेत ना...खेळा आनंद लुटा

 

या नव्या अपडेटमध्ये नवीन मानचित्र दिले जाणार आहे. तसेच नवीन स्टाईलसोबत अनेक नवीन फिचर्स मिळणार असल्याचा दावा PlayerIGN ने केला आहे. PUBG Mobile 2 युजर्ससाठी Google Play Store आणि Apple App Store सारख्या दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध केले जाणार आहे. 
PUBG गेम संदर्भात याआधी काही माहिती या वेबसाईटने दिली ती बहुतांश खरी ठरली आहे. भारतात बंदी असली तरीही व्हीपीएनद्वारे अवनेकजण पब्जी हा गेम खेळत आहेत. त्यांना हा नवीन गेम कॉम्प्युटरवर खेळता येणार आहे. कॉम्प्युटर, गेमिंग कन्सोल आणि मोबाईलमध्ये क्रॉस प्लॅटफॉर्मवर हा गेम उपलब्ध होणार आहे. 


केंद्र सरकारने गेल्या वर्षी 118 चिनी अॅपवर बंदी आणताना PUBG Mobile आणि PUBG Mobile Lite वर देखील बंदी आणली होती. यावेळी ही चिनी अॅप देशाची अखंडता आणि संरक्षण विषयक, देशाच्या सुरक्षेसाठी धोक्याची असल्याचे सांगण्यात आले होते. या अॅपद्वारे भारतीयांकडून डेटादेखील मिळविला जात असल्याचा आरोप केला होता. यामुळे देशाच्या सुरक्षेचा मुद्दा असल्याने या चिनी अॅपवर बंदी आणण्यात आली होती. 

Web Title: PUBG Mobile 2 will launch soon; Indians can also play game because of cross platform, Claims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.