PUBG Mobile गेम आज खेळता येणार नाही...हे आहे कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2019 12:17 PM2019-02-18T12:17:00+5:302019-02-18T12:21:22+5:30
18 फेब्रुवारी म्हणजे आज जगभरामध्ये PUBG हा गेम खेळता येणार नाही.
नवी दिल्ली : PUBG Mobile हा गेम खेळणाऱ्यांसाठी एक वाईट बातमी आहे. 18 फेब्रुवारी म्हणजे आज जगभरामध्ये PUBG हा गेम खेळता येणार नाही. कारण सर्व्हरला अपडेट करण्यासाठी सर्व्हर काही काळासाठी बंद ठेवण्यात येणार असल्याने PUBG Mobile ने यासंबंधीत ट्विट केले आहे. भारतासाठी आज दुपारी दीड वाजेपर्यंत हा गेम बंद राहणार आहे.
PUBG साठी काही अपडेटेड पॅच उपलब्ध करण्यात येणार आहेत. यामुळे टेनसेंट डेव्हलपर्सनी PUBG Mobile ला काही तासांसाठी ऑफलाईन ठेवले आहे. नवीन अपडेट आल्यानंतर युजर सेटिंगमधून शॅडो डिसेबल करू शकणार आहेत. तसेच मागील निकाल केवळ एका महिन्यासाठीच उपलब्ध होणार आहेत. याशिवाय नवीन बंदूक आणि सप्लायही देण्यात आला आहे.
PUBG MOBILE will be taken offline for maintenance from 12AM to 8AM (UTC) on February 18th. Service may resume sooner or later. Stay tuned!
— PUBG MOBILE (@PUBGMOBILE) February 16, 2019
PUBG Mobile गेम लाँच झाल्यापासूनच अपडेट दिल्या जात आहेत. वर्षाच्या सुरुवातीला Vikendi Snow Map अपडेट देण्यात आली होती. या अपडेटमध्ये प्लेयर्सना नवनवीन आणि रोमांचकारी फिचर्स देण्यात आले आहेत. यामध्ये स्नो मोबाईल आणि हायटेक बंदुकाही होत्या. PUBG Mobile लवकरच 0.11.0 अपडेट देण्याच्या तयारीत आहे. या अपडेमध्ये प्लेयर्सना झोंबी मोड देण्यात येणार आहे.
गेम घातक...
मुलांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच आजकाल मोबाईलवरील गेमचे वेड लागलेले पाह्यला मिळते. सध्या अनेकजण पबजी या गेममध्ये व्यस्त दिसत आहेत. या गेमला लोक मोठ्या प्रमाणावर पसंती देत आहेत. पोकेमॉन गो, ब्लू व्हेल यांसारख्या गेमनी काही दिवसांपूर्वी मुलांवर गारूड घातले होते. त्यात पबजीची भर पडली आहे. अनेक पालकांनी या गेमवर बंदी घालण्याची मागणी केली असून, मानसोपचार तज्ज्ञांच्या मते हा गेम जिवाला घातक आहे.
पोकोमॉन, ल्युडो किंग व ब्लू व्हेल या गेमनंतर पबजी हा गेम इंटरनेटवरील सध्याचा बेस्ट अॅक्शन गेम आहे. हा गेम मोबाइल, टॅब, लॅपटॉपवर खेळता येतो. दक्षिण कोरियन व्हिडिओ गेम कंपनीने ब्लू होल सहायक अंतर्गत हा गेम बनवला आहे. या गेममध्ये कमीत कमी १ ते ४ सदस्य सहभागी होऊ शकतात. त्यांच्या बरोबरीने हा गेम समूहाने खेळला जातो. या गेममध्ये गेम खेळणारा सैनिकाची भूमिका बजावत, वेगवेगळ्या क्षेत्रांत घुसून विरोधी पक्षाला बंदुकीने मारायचे काम करतो. त्यांचे साहित्य हस्तगत करतो. या गेममध्ये वेगवेगळ्या ठिकाणांवरून गेम खेळणारे खेळाडू एकमेकांशी लाइव्ह संवाद साधतात आणि एकमेकांना मार्गदर्शन करतात. या गेमवर आकर्षक बक्षिसे असल्यामुळे या गेमकडे लोकांचे आकर्षण वाढत आहे.