PUBG Game: अखेर आजपासून 'पबजी' भारतातून हद्दपार; कंपनीने सोशल मीडियातून केलं ‘गुड बाय'

By प्रविण मरगळे | Published: October 30, 2020 09:38 AM2020-10-30T09:38:29+5:302020-10-30T09:40:48+5:30

PUBG Gaming App News: पबजीसह ११८ चिनी ऍप्सवर बंदी घालण्याचा निर्णय मोदी सरकारनं २ सप्टेंबरला घेतला. या ऍप्सच्या माध्यमातून वापरकर्त्यांचा डेटा गोळा केला जातो.

PUBG Mobile to terminate access for users in India on October 30 following ban order | PUBG Game: अखेर आजपासून 'पबजी' भारतातून हद्दपार; कंपनीने सोशल मीडियातून केलं ‘गुड बाय'

PUBG Game: अखेर आजपासून 'पबजी' भारतातून हद्दपार; कंपनीने सोशल मीडियातून केलं ‘गुड बाय'

googlenewsNext
ठळक मुद्देपबजीसह ११८ चिनी ऍप्सवर बंदी घालण्याचा निर्णय मोदी सरकारनं २ सप्टेंबरला घेतलाजर तुम्ही मोबाईलमध्ये एपीके इन्स्टॉल केलं असेल तरीही आता पबजी गेम खेळता येणार नाही.पबजी मोबाईल गेमच्या एकूण युजर्सच्या संख्येत भारताचा वाटा २५ टक्के होता.

नवी दिल्ली – भारतात आजपासून पबजी मोबाईल(PUBG Mobile) आणि पबजी मोबाईल लाइट(PUBG Mobile Lite) पूर्णपणे बंद होणार असल्याने माहिती कंपनीने फेसबुक पोस्टद्वारे दिली आहे. त्यामुळे पबजी खेळणाऱ्यांसाठी निराशाजनक बातमी आहे. एक महिन्यापूर्वी देशात ११८ अँप्सवर बंदी आणण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. यात बहुचर्चित पबजी एप्सवरही बंदी आणली होती.

चीनकडून सुरक्षेचा धोका पाहता भारतानेचीनी एप्सवर बंदी आणण्याचा निर्णय घेतला. याबाबत कंपनीने फेसबुक पोस्टमध्ये म्हटलंय की, वापरकर्त्याच्या डेटाचे संरक्षण करणे नेहमीच प्रथम प्राधान्य दिले गेले आहे आणि आम्ही नेहमीच भारतात लागू असलेल्या डेटा संरक्षण कायद्यांचे आणि नियमांचे पालन केले आहे. आमच्या गोपनीयता धोरणात जाहीर केल्यानुसार सर्व वापरकर्त्यांची गेमप्ले माहिती पारदर्शक पद्धतीने प्रक्रिया केली जाते. आम्ही या निर्णयाबद्दल मनापासून दिलगिरी व्यक्त करतो आणि भारतातील पबजी मोबाइलसाठी दिलेलं समर्थन आणि प्रेमाबद्दल मनापासून आभारी आहोत. टेन्सेंन्ट गेमकडून आज भारतातील सेवा संपुष्टात आली आहे.

जर तुम्ही मोबाईलमध्ये एपीके इन्स्टॉल केलं असेल तरीही आता पबजी गेम खेळता येणार नाही. सर्व प्रकाशित अधिकार पबजीच्या मालकांना परत करण्यात आले आहेत. पबजी मोबाईल आणि पबजी मोबाईल लाइटवर कोरोना लॉकडाऊन काळात युजर्सची संख्या वाढल्यानंतर यावर बंदी आणली गेली. पबजी मोबाईल गेमच्या एकूण युजर्सच्या संख्येत भारताचा वाटा २५ टक्के होता. भारतात या एप्सवर बंदी आणल्यानंतर चीनच्या या कंपनीचा बाजार भाव जवळपास ३४ अब्ज डॉलरने(२,४८,००० रुपये) घसरला. टेन्सेन्ट PUBG APP च्या माध्यमातून भारतात सर्वाधिक कमाई करत होती. दररोज या कंपनीला तब्बल ३ कोटी एक्टिव्ह युजर्स जोडले जात होते.

चिनी ऍप्सवर मोदी सरकारची बंदी

पबजीसह ११८ चिनी ऍप्सवर बंदी घालण्याचा निर्णय मोदी सरकारनं २ सप्टेंबरला घेतला. या ऍप्सच्या माध्यमातून वापरकर्त्यांचा डेटा गोळा केला जातो. त्यामुळे वापरकर्त्यांसोबतच देशाच्या सुरक्षेलाही धोका निर्माण होऊ शकतो, असं सरकारनं ऍप्स बंदीचा निर्णय जाहीर करताना सांगितलं. बंदी घालण्यात आलेल्या ११८ ऍप्समध्ये काही लोकप्रिय ऍप्सचाही समावेश आहे. लॉकडाऊनच्या काळात लोकप्रिय झालेल्या ल्युडो, कॅरम या ऍप्सवरही सरकारनं बंदी घातली. काही दिवसांपूर्वी PUBG कॉर्पोरेशनकडून एका पदासाठी नोकरीची जाहिरात काढण्यात आली होती. त्यामुळे भारतातील PUBG वरील बंदी उठविण्याचे संकेत असल्याचे काहीजण मानत आहेत

Read in English

Web Title: PUBG Mobile to terminate access for users in India on October 30 following ban order

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.