PUBG New State गेम डाउनलोड केल्याने बिघडू शकतो तुमचा फोन; अँड्रॉइड स्मार्टफोन होऊ शकतात निकामी 

By सिद्धेश जाधव | Published: November 12, 2021 03:17 PM2021-11-12T15:17:57+5:302021-11-12T15:18:02+5:30

PUBG: New State मूळे अनेक अँड्रॉइड युजर्सना समस्यांचा सामना करावा लागत आहे. काही स्मार्टफोन या गेममुळे निकामी ठरल्याची तक्रार युजर्सनी केली आहे.  

Pubg new state bug issue bricking devices running on android 12 in india google play app store   | PUBG New State गेम डाउनलोड केल्याने बिघडू शकतो तुमचा फोन; अँड्रॉइड स्मार्टफोन होऊ शकतात निकामी 

PUBG New State गेम डाउनलोड केल्याने बिघडू शकतो तुमचा फोन; अँड्रॉइड स्मार्टफोन होऊ शकतात निकामी 

Next

PUBG: New State हा गेम डेव्हलपर क्राफ्टनचा नवीन बॅटल रॉयल गेम आहे. हा गेम कालच भारतासह जगभरात दाखल झाला आहे. परंतु या नव्या गेममुळे Android डिवाइसेस निकामी होत आहेत. काही युजर्सनी या समस्यांची माहिती सोशल मीडियावरून दिली आहे. ज्या युजर्सना पबजी न्यू स्टेटमुळे समस्या येत आहे, त्यात Android 12 वर चालणाऱ्या स्मार्टफोन्सचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे.  

तसेच Android च्या जुन्या व्हर्जनवर चालणाऱ्या फोनवर देखील या गेमचा परिणाम होत आहे. विशेष म्हणजे PUBG: New State लाँच झाल्यानंतर काही तासांतच या तक्रारी समोर येऊ लागल्या होत्या. काही युजर्सचे फोन हँग झाले, काहींचे फोन बंद पडले तर काहींना सर्वर नॉट कनेक्टड असा एरर दिसत होता.  

ज्या युजर्सना पबजी न्यू स्टेटमुळे त्रास झाला त्यात टिपस्टर मुकुल शर्माचा देखील समावेश आहे. PUBG: New State इंस्टॉल केल्यानंतर मुकुलचा फोनला ब्रिकिंगची समस्या सुरु झाली. मुकुलचा Oppo Find X2 Pro हा स्मार्टफोन हार्ड ब्रिक (कडक वीट) बनला होता. फोन चालू होत नव्हता, काही वेळाने हा डिवाइस रिकव्हर होऊ शकला. गेमच्या लॉगिन स्क्रीनवर तीन पैकी कोणताही एक ऑप्शन निवडल्यावर फोन बूट लूप मध्ये गेला. म्हणजे फोन ऑन ऑफ होऊ लागला, त्यानंतर फोन एकाच जागी थांबला होता.  

PUBG New State   

PUBG New State यावर्षी फेब्रुवारीमध्ये प्री-रेजिस्ट्रेशनसाठी उपलब्ध झाला होता. भारतीय BGMI आणि ग्लोबल व्हर्जन PUBG Mobile प्रमाणेच हा देखील एक Battle Royale Game आहे. जो कुणीही मोफत डाउनलोड करू शकतो. नवीन ग्राफिक्समुळे या गेमचा आकार 1.44GB आहे.यात Troi, Erangel 2051, 4v4 TDM आणि Training असे चार गेमिंग मोड मिळतात.   

PUBG New State मध्ये कारच्या ट्रंकमध्ये वेपन्स साठवून ठेवण्याचा पर्याय देण्यात येईल. जो याआधीच्या PUBG गेममध्ये मिळत नव्हता. प्लेयर्स गेममधील परिस्थितीनुसार वेपन्स बदलू शकतील. तसेच मेलेल्या गेमर्सच्या कारची ट्रंक लुटू देखील शकतील.   

Web Title: Pubg new state bug issue bricking devices running on android 12 in india google play app store  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.