PUBG New State अँड्रॉईड, आयओएससाठी लाँच; भारतातूनही होतेय प्री रजिस्ट्रेशन

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2021 04:28 PM2021-02-25T16:28:58+5:302021-02-25T16:31:53+5:30

PUBG Game, PUBG New State in India: चीनच्या हल्ल्यानंतर बंदी असलेला गेम व्हीपीएनवर खेळत असले तरी आता भारतीय युजरसाठी मोठी बातमी आहे. PUBG New State लाँच झाला असून अँड्रॉईड, आयओएससाठी उपलब्ध करण्यात येत आहे.

PUBG New State launches for Android, iOS; Pre-registration is also done from India | PUBG New State अँड्रॉईड, आयओएससाठी लाँच; भारतातूनही होतेय प्री रजिस्ट्रेशन

PUBG New State अँड्रॉईड, आयओएससाठी लाँच; भारतातूनही होतेय प्री रजिस्ट्रेशन

googlenewsNext

जगभरासह भारतातील तरुणाईमध्ये PUBG Mobile गेमने धुमाकूळ घातला होता. चीनच्या हल्ल्यानंतर बंदी असलेला गेम व्हीपीएनवर खेळत असले तरी आता भारतीय युजरसाठी मोठी बातमी आहे. PUBG New State लाँच झाला असून अँड्रॉईड, आयओएससाठी उपलब्ध करण्यात येत आहे. यासाठी प्री रजिस्ट्रेशन सुरु करण्यात आले आहे. महत्वाचे म्हणजे हे रजिस्ट्रेशन भारतातूनही करता येत आहे. यामुळे भविष्यात पब्जीवरील बंदी उठविण्यात येण्याची शक्यता आहे. (PUBG: New State is a futuristic new battle royale game for Android and iOS.)


PUBG: New State ला पब्जी स्टुडिओने (PUBG Studio) तयार केले आहे. युट्यूबरदेखील याचा एक ट्रेलर जारी करण्यात आला आहे. याशिवाय PUBG: New State नावाने वेबसाईट आणि सोशल मीडियावर अकाउंट बनविण्यात आली आहेत. 


गेमच्या ट्रेलरमध्ये काही गेम प्ले, ग्राफिक्स आणि नवीन मेकॅनिक्स देण्यात आली आहेत. PUBG: New State ला 2051च्या थीमवर तयार करण्यात आले आहे. म्हणजेच 2051 मध्ये येणाऱ्या गाड्या,. हत्यारे आणि नवीन मॅप्स आदीची झलक दाखविण्यात आली आहे. हा गेम Krafton ने पब्लिश केले असून ती चीनची नाही तर दक्षिण कोरियाची व्हिडीओ गेमिंग कंपनी आहे. 

PUBG Mobile 2 ची धडाक्यात एन्ट्री होणार; बंदी असूनही बिनदिक्कत खेळता येणार


PUBG: New State साठी गुगलच्या प्ले स्टोअर आणि अॅपलच्या अॅप स्टोअरवर रजिस्टर करता येणार आहे. महत्वाचे म्हणजे हे भारतातही करता येत आहे. यामुळे पब्जी पुन्हा भारतात परतला आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही. प्री रजिस्टर करणाऱ्यांसाठी व्हेईकल स्कीन मिळणार आहे. सध्या हा गेम रजिस्ट्रेशनसाठी उपलब्ध असला तरी तो कधी लाँच होणार हे सांगण्यात आलेले नाही. मात्र, लवकरच हा गेम उपलब्ध होणार आहे. 

केंद्र सरकारने गेल्या वर्षी 118 चिनी अॅपवर बंदी आणताना PUBG Mobile आणि PUBG Mobile Lite वर देखील बंदी आणली होती. यावेळी ही चिनी अॅप देशाची अखंडता आणि संरक्षण विषयक, देशाच्या सुरक्षेसाठी धोक्याची असल्याचे सांगण्यात आले होते. या अॅपद्वारे भारतीयांकडून डेटादेखील मिळविला जात असल्याचा आरोप केला होता. यामुळे देशाच्या सुरक्षेचा मुद्दा असल्याने या चिनी अॅपवर बंदी आणण्यात आली होती. 

Web Title: PUBG New State launches for Android, iOS; Pre-registration is also done from India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.