सर्वात शक्तिशाली प्रोसेसरसह क्वालकॉमचा स्मार्टफोन लाँच; मिळणार 16 जीबी रॅम आणि 512GB स्टोरेज 

By सिद्धेश जाधव | Published: July 9, 2021 05:28 PM2021-07-09T17:28:46+5:302021-07-09T17:30:32+5:30

Smartphone for Snapdragon Insiders: क्वालकॉमने फोन कंपनीच्या लॉयल्टी प्रोग्राम Snapdragon Insiders साठी खास लाँच केला गेला आहे. 

Qualcomm announces smartphone for snapdragon insiders with 16gb ram know price  | सर्वात शक्तिशाली प्रोसेसरसह क्वालकॉमचा स्मार्टफोन लाँच; मिळणार 16 जीबी रॅम आणि 512GB स्टोरेज 

सर्वात शक्तिशाली प्रोसेसरसह क्वालकॉमचा स्मार्टफोन लाँच; मिळणार 16 जीबी रॅम आणि 512GB स्टोरेज 

googlenewsNext

स्मार्टफोनमध्ये रस असणाऱ्या लोकांना Qualcomm हे नाव माहित असेल. ही कंपनी स्मार्टफोनमधील प्रोसेसर बनवण्याचे काम करते. क्वालकॉमने आपला पहिला स्मार्टफोन Smartphone for Snapdragon Insiders लाँच केला आहे. या फोनच्या निर्मितीसाठी कंपनीने Asus सोबत भागेदारी केली आहे. कंपनीने Smartphone for Snapdragon Insiders नावाचा हा प्रीमियम फोन कंपनीच्या लॉयल्टी प्रोग्राम Snapdragon Insiders साठी लाँच केला आहे.  (Qualcomm announces 'Smartphone for Snapdragon Insiders')

Smartphone for Snapdragon Insiders ची किंमत 

Smartphone for Snapdragon Insiders मध्ये 16 जीबी रॅम आणि 512 जीबी स्टोरेज देण्यात आली आहे. या स्मार्टफोनची किंमत 1,499 डॉलर म्हणजे अंदाजे 1,12,000 रुपयांमध्ये लाँच केला आहे. हा फोन Asus च्या ऑनलाइन किंवा ऑफलाइन रिटेल स्टोरवरून ऑगस्टमध्ये विकत घेता येईल. सर्वप्रथम चीन, जर्मनी, जपान, अमेरिका, यूके आणि भारतात हा फोन उपलब्ध होईल.  

Smartphone for Snapdragon Insiders चे स्पेसिफिकेशन 

क्वालकॉमच्या या खास स्मार्टफोनमध्ये 6.78 इंचाचा फुल एचडी+ सॅमसंग अ‍ॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 144Hz रिफ्रेश रेट, 1080×2448 पिक्सल रेजोल्यूशन, 20.4:9 अस्पेक्ट रेश्यो व कॉर्निंग ग्लास विक्ट्स प्रोटेक्शनसह सादर करण्यात आला आहे. या डिस्प्लेला HDR10 आणि HDR10+ सर्टिफिकेशन मिळाले आहे. या फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 888 प्रोसेसर आहे. या प्रोसेसरला 16 जीबी रॅम आणि 512 जीबी स्टोरेजची जोड देण्यात आली आहे. 

क्वालकॉमच्या या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. यात मुख्य सेन्सर 64 मेगापिक्सलचा Sony IMX686 आहे. त्याचबरोबर 12 मेगापिक्सलचा Sony IMX363 सेन्सर आणि 8 मेगापिक्सलची टेलिफोटो शूटर लेन्स आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये 24 मेगापिक्सलचा सेन्सर देण्यात आला आहे. या फोनमध्ये क्वालकॉम क्विक चार्ज 5.0 टेक्नॉलॉजीसह 4,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. 

Web Title: Qualcomm announces smartphone for snapdragon insiders with 16gb ram know price 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.