भिंतीच्या आरपार बघू शकतो हा पोर्टेबल डिवाइस, सैनिक आणि पोलिसांची करतो मदत
By सिद्धेश जाधव | Published: June 18, 2022 01:03 PM2022-06-18T13:03:36+5:302022-06-18T13:03:47+5:30
इस्त्रायलच्या एका कंपनी भिंतीच्या आरपार बघण्यास मदत करणाऱ्या डिवाइसची निर्मिती केली आहे.
एखाद्या साय-फाय चित्रपटात शोभेल अशा एका डिवाइसची निर्मिती इस्त्रायलमधील एका कंपनीनं केली आहे. हे गॅजेट भिंतीच्या आरपार बघण्यास मदत करतं. Camero-Tech नावाच्या फर्मनं हे डिवाइस तयार केलं आहे. ज्याचं नाव Xaver 1000 असं ठेवण्यात आली आहे. या हाय परफॉर्मन्स डिवाइसची खासियत म्हणजे हे पोर्टेबल आहे, त्यामुळे कुठेही सहज नेता येतं.
Xaver 1000 ची निर्मिती करणारी Camero-Tech फर्म Samy Katsav Group च्या अंतर्गत येते. ही कंपनी ग्लोबल फ्रंटलाइन डिफेंस, लॉ इन्फोर्समेंट सॉल्यूशन, मरीन इंफ्रास्ट्रक्चर आणि प्रॉपर्टी डेवलमेंट सॉल्यूशनसाठी ओळखली जाते. ब्रँडनं हा नवीन गॅजेट आपल्या प्रोडक्ट लाईनमध्ये जोडला आहे, त्यामुळे भिंतीच्या पलीकडल्या हालचालींची सहज माहिती घेता येईल. त्यामुळे Xaver 1000 च्या मदतीनं सुरक्षा दल आणि लॉ इन्फोर्समेंट एजेंसीच्या ऑपरेशनची क्षमता वाढेल.
काय आहे खास
Xaver 1000 मध्ये AI बेस्ड लाईव्ह टार्गेट ट्रॅकिंग सिस्टम देण्यात आली आहे. तसेच डिवाइसमध्ये 3D 'Sense-Through-The-Wall' टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला आहे. Xaver 1000 मध्ये 10.1-इंचाचा टच स्क्रीन डिस्प्ले देण्यात आला आहे, जो सोप्या युजर इंटरफेससह येतो. कंपनीनुसार, ही टेक्नॉलॉजी पूर्णपणे रेडिएशन फ्री आहे.
या टेक्नॉलॉजीच्या मदतीने डिवाइस भिंतीच्या पलीकडे असलेल्या माणसाची किंवा वस्तूची आणि अडथळ्यांची माहिती देतो. तसेच भिंती पलीकडे असलेला व्यक्ती बसला आहे, उभा आहे की झोपला आहे, याची माहिती देखील मिळते. वस्तूंच्या उंचीचा अंदाज देखील लावता येतो.
Xaver 1000 ची निर्मिती सैन्य, लॉ इन्फोर्समेंट एजेंसी, सर्च आणि रेस्क्यू टीमसाठी करण्यात आली आहे. Xaver सीरीजच्या याआधी आलेल्या व्हर्जनचा वापर जगभरातील सुमारे 50 देशांच्या फोर्सेस करत आहेत.