मराठवाडा, मध्यमहाराष्ट्र, विदर्भात पावसाची हजेरी

By Admin | Published: September 7, 2015 11:27 PM2015-09-07T23:27:38+5:302015-09-07T23:27:38+5:30

पुणे : गेल्या दोन दिवसापासून मराठवाड्यात सुरू असणार्‍या पावसाने सोमवारी ही हजेरी लावली. मराठवाड्यातील बहुतांश भागात पाऊस झाला असून गेल्या २४ तासात मराठवाड्यातील देगलूर येथे सर्वाधिक ८० मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. त्याचबरोबर मध्यमहाराष्ट्र व विदर्भात पावसाने बळीराजाला दिलासा दिला. पुढील दोन दिवसात मराठवाड्यात असाच पाऊस राहणार आहे तर विदर्भ, कोकण, मध्य महाराष्ट्रात ही तुरळक पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.

Rain in the Marathwada, Central India, Vidarbha | मराठवाडा, मध्यमहाराष्ट्र, विदर्भात पावसाची हजेरी

मराठवाडा, मध्यमहाराष्ट्र, विदर्भात पावसाची हजेरी

googlenewsNext
णे : गेल्या दोन दिवसापासून मराठवाड्यात सुरू असणार्‍या पावसाने सोमवारी ही हजेरी लावली. मराठवाड्यातील बहुतांश भागात पाऊस झाला असून गेल्या २४ तासात मराठवाड्यातील देगलूर येथे सर्वाधिक ८० मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. त्याचबरोबर मध्यमहाराष्ट्र व विदर्भात पावसाने बळीराजाला दिलासा दिला. पुढील दोन दिवसात मराठवाड्यात असाच पाऊस राहणार आहे तर विदर्भ, कोकण, मध्य महाराष्ट्रात ही तुरळक पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.
मान्सून सुरू झाल्यापासून राज्यात सर्वात कमी पाऊस मराठवाड्यात झाला होता. त्यामुळे मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट पसरले होते. मात्र दोन दिवसापासून सुरू असणार्‍या पावसाने मराठवाडयाला दिलासा मिळाला आहे. गेल्या २४ तासात मराठवाड्यात देगलूर नंतर जालना येेथे ४० मिमी, अमळनेर ३० मिम, केज, खुलताबाद, मुखेड येेथे प्रत्येकी ज२० मिमी तर अहमदपुर, अंबेजोगाई, चाकूर, धारूर, गंगापूर, घनसावंगी, हदगाव, हिंगोली, कळंब, कळमनुरी, उस्मानाबाद, परतूर, पाथरी, पुर्णा, रेणापूर, सेनगाव, वसमत प्रत्येकी १० मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. मध्यमहाराष्ट्रात राहूरी येथे ४० मिमी, अहमदनगर, जाट, कवठेमहाकाळ, विटा येथे प्रत्येकी १० मिमी तर विदर्भात भामरागड, महागाव, रामटेक येथे प्रत्येकी २० मिमी, कुही, पुसद, रिसोड येथे प्रत्येकी १० मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. कोकणात मात्र मागील तीन दिवसापासून पावसाने पाठ फिरवली आहे.
येत्या २ दिवसात मराठवाडयात बहुतेक ठिकाणी पाऊस पडणार आहे तर विदर्भ, कोकण, मध्य महाराष्ट्रात ही तुरळक पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. दरम्यान पुण्यातही काही भागात पावसाच्या हलक्या सरी पडण्याची शक्यता वर्तविली आहे.

चौकट
नैऋर्त्य मोसमी वार्‍यांनी (मॉन्सून) शुक्रवारी ४ सप्टेंब रोजी पश्चिम राजस्थानच्या काही भागातून देशातून परतीच्या प्रवासाला सुरवात केली अनुपगड, नागौर, जोधपूर आणि बारमेरपयंर्त मॉन्सूनने काढता पाय घेतला आहे. मात्र अद्यापही हे वारे राजस्थानाच्या पि›म भागातच असल्याची माहिती हवामानशास्त्र विभागाने दिली.

Web Title: Rain in the Marathwada, Central India, Vidarbha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.