सुपरस्टार Rajnikanth यांच्या हस्ते व्हॉइस बेस्ड सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Hoote लाँच; जाणून घ्या या अॅप वैशिष्ट्ये
By सिद्धेश जाधव | Published: October 26, 2021 11:51 AM2021-10-26T11:51:45+5:302021-10-26T11:53:56+5:30
Rajnikanth Launches Hoote App: Hoote App ची निर्मिती रजनीकांत यांची कन्या Soundarya Vishagan यांनी Sunny Pokala यांच्यासोबत मिळून केली आहे. हा एक व्हॉइस बेस्ड सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे.
सुपरस्टार रजनीकांत यांनी एक व्हॉईस-बेस्ड सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Hoote लाँच केले आहे. या अॅपची निर्मिती Rajnikanth यांची मुलगी Soundarya Vishagan यांनी Amtex कंपनीचे सीईओ Sunny Pokala यांच्यासोबत मिळून केली आहे. रजनीकांत यांनी ट्विटरवरून या नव्या सोशल मीडिया अॅपची माहिती दिली आहे. “Hoote– व्हॉईस-बेस्ड सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, भारताकडून जगासाठी,”असे त्यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे.
सध्या व्हॉइस बेस्ड सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचे महत्व वाढले आहे. ट्विटरने ट्विटर स्पेसेस सेगमेंट सुरु केले आहे. क्लब हाऊस या सेगमेंट आघाडीवर आहे. तसेच डिस्कॉर्डचा देखील पर्याय उपलब्ध आहे. त्यात आता हूटची भर पडली आहे. Hoote च्या टीममध्ये Freshworks चे संस्थापक गिरीश मातृबूतम आणि यशस्वी उद्योजक अरविंद पार्थसारथी देखील आहेत.
🙏🏻🇮🇳 pic.twitter.com/vkTf6mxYUu
— Rajinikanth (@rajinikanth) October 24, 2021
या प्लॅटफॉर्मवर 60-सेकंदाची लाईव्ह व्हॉईस रेकॉर्डिंग करण्याचा पर्याय मिळतो. तसेच युजर्स प्री रेकॉर्डेड कन्टेन्ट देखील इथे अपलोड करू शकतात. या प्लॅटफॉर्मवर लोक कोणत्याही भाषेत आपले विचार आणि भावना कुठूनही व्यक्त करू शकतील. अशी या प्लॅटफॉर्मची खासियत असेल असे सौंदर्या यांनी एनडीटीव्हीला सांगितले. तसेच, हूट अॅप लाँच करून मला खूप आनंद झाला आहे. या अॅपमुळे लोकांना आपल्या आवडीच्या भाषेत व्यक्त होण्याचा पर्याय मिळेल, असे सुपरस्टार रजनीकांत यांनी म्हटले आहे.