रक्षाबंधनासाठी ऑनलाईन शॉपिंग करताना सावधान; स्कॅमर्स झालेत एक्टिव्ह, करू नका 'ही' चूक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2024 01:43 PM2024-08-19T13:43:28+5:302024-08-19T13:43:57+5:30

रक्षाबंधनात सायबर स्कॅमर्सही एक्टिव्ह झाले आहेत, ज्यामुळे तुमचं आर्थिक नुकसान होऊ शकतं.

raksha bandhan 2024 online shopping and quick commerce increase and beware of cyber fraud | रक्षाबंधनासाठी ऑनलाईन शॉपिंग करताना सावधान; स्कॅमर्स झालेत एक्टिव्ह, करू नका 'ही' चूक

रक्षाबंधनासाठी ऑनलाईन शॉपिंग करताना सावधान; स्कॅमर्स झालेत एक्टिव्ह, करू नका 'ही' चूक

देशभरात रक्षाबंधनाचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. एका रिपोर्टनुसार, या वर्षी लोकांनी ईकॉमर्स प्लॅटफॉर्मवरून भरपूर शॉपिंग केली आहे. इतकेच नाही तर काहींनी Blinkit आणि Zepto इत्यादी क्विक कॉमर्स प्लेटफॉर्म देखील वापरले आहेत. 

इकॉनॉमिक टाइम्सच्या वृत्तानुसार, या रक्षाबंधनाला क्विक कॉमर्स मार्केटला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या रक्षाबंधनात ब्लिंकिट आणि झेप्टोच्या विक्रीत वाढ झाली आहे. यासोबतच ते येत्या सणांसाठीही मोठी तयारी करत आहे. रक्षाबंधनाच्या निमित्ताने सायबर फ्रॉडच्या घटना देखील वाढल्या आहेत, ज्यामुळे तुमची फसवणूक होऊ शकते.

या रक्षाबंधनात सायबर स्कॅमर्सही एक्टिव्ह झाले आहेत, ज्यामुळे तुमचं आर्थिक नुकसान होऊ शकतं. बऱ्याच सायबर स्कॅममध्ये लोकांना आपली आयुष्यभराची कमाईही गमवावी लागते. आजकाल सायबर स्कॅमच्या वेगवेगळ्या पद्धती समोर आल्या आहेत ज्यात जॉबपासून ते फेक इन्वेस्टमेंटपर्यंत सर्व गोष्टींचा समावेश आहे. 

अशा परिस्थितीत, एखाद्याने फेक ऑफर, फेक भेटवस्तू आणि कोणत्याही अनोळखी लिंक्सवर क्लिक करणं टाळले पाहिजे. याशिवाय इतर कोणत्याही वेबसाइटवर OTP वगैरे शेअर करू नका. Flipkart, Amazon India आणि इतर कंपन्या दिवाळी सेलची तयारी करत आहेत, जिथे दोन्ही प्लॅटफॉर्म मोठ्या डील, सूट आणि इतर फायदे देतात. 

क्विक कॉमर्स मार्केटही तयारी करत असून या सणासुदीच्या मोसमात प्रवेश करण्यास सज्ज आहे. अनेक प्लॅटफॉर्म त्यांच्या स्टॉक युनिट्स दुप्पट करण्याची तयारी करत आहेत, जेणेकरून ग्राहकांना जलद आणि जास्त रेंजमध्ये वस्तू पुरवल्या जाऊ शकतात. Zepto आपली संख्या दुप्पट करण्यावर काम करत आहे, ज्याची माहिती कंपनीच्या सीईओने स्वतः शेअर केली आहे.
 

Web Title: raksha bandhan 2024 online shopping and quick commerce increase and beware of cyber fraud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.