अरे व्वा! घरबसल्या असं अपडेट करा Ration Card; पत्ता, मोबाईल नंबर बदलणं झालं आता आणखी सोपं
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2021 06:21 PM2021-01-27T18:21:16+5:302021-01-27T19:04:39+5:30
Ration Card Update : रेशन कार्डमध्ये कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या नावाची नोंदणी करायची असल्यास ती कशी करायची, घरबसल्या रेशन कार्ड कसं अपडेट करायचं हे जाणून घेऊया.
नवी दिल्ली - रेशन कार्ड (Ration card) अत्यंत महत्त्वाचं आहे. रेशन कार्डमध्ये काही बदल करणं आता अत्यंत सोपं होणार आहे. कार्डवरील पत्ता, नावात बदल किंवा आणखी काही बदल करायचा असेल तर हे सर्व घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने करता येणार आहेत. केंद्र सरकारने 'वन नेशन, वन रेशन कार्ड' योजना लागू करण्याची घोषणा केली आहे. रेशन कार्डमध्ये कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या नावाची नोंदणी करायची असल्यास ती कशी करायची, घरबसल्या रेशन कार्ड कसं अपडेट करायचं हे जाणून घेऊया.
पत्ता असा करा अपडेट
- सर्वप्रथम भारत सरकारच्या Www.pdsportal.nic.in या लिंकवर जा.
- यानंतर राज्यांची नावे असलेल्या टॅबवर क्लिक करा.
- यानंतर नवीन टॅबवर राज्यांची यादी येईल.
- तुम्ही ज्या राज्यात राहत आहात त्याची निवड करा.
- यानंतर नवीन पेज ओपन होईल.
त्यानंतर घरबसल्या रेशन कार्डमध्ये (Ration card) माहिती अपडेट करण्यासाठी संबंधित राज्याच्या अन्न पुरवठा विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर जा. पहिल्या वेळेस वेबसाईटवर लॉगिन आयडी तयार करावा लागेल. यामध्ये जी माहिती भरायची आहे ती भरून सबमिट या पर्यायावर क्लिक करायचं आहे. मोबाईल नंबरही अशाच पद्धतीने अपडेट करता येतो.
- मोबाईल नंबर अपडेट करण्यासाठी सर्वप्रथम nfs.delhi.gov.in/Citizen/UpdateMobileNumber.aspx या लिंकवर जा.
- वेगवेगळ्या राज्यांसाठी हा लिंक अॅड्रेस हा वेगवेगळा असणार आहे.
- चार बॉक्स पाहायला मिळतील. Aadhar Number of Head of Household/NFS ID। हा पहिला बॉक्स आहे.
- यात कुटुंब प्रमुखाचा आधार क्रमांक टाकावा लागेल. पुढच्या बॉक्समध्ये रेशन कार्ड नंबर लिहा.
- तिसऱ्या बॉक्समध्ये कुटुंब प्रमुखाचे नाव टाकून सर्वात शेवटच्या बॉक्समध्ये जो मोबाईल क्रमांक अपडेट करायचा आहे तो टाका.
- सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर सेव्हवर क्लिक करा, तुमचा मोबाईल नंबर अपडेट होईल. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
जाणून घ्या, आधार कार्ड अपडेट करण्याची योग्य पद्धत https://t.co/sZzO6mGiRr#adharcard
— Lokmat (@MiLOKMAT) January 26, 2021