आता हवेत उडण्याचं स्वप्न होणार पूर्ण, हा सूट परिधान करा हवेत आयर्न मॅनसारखे उडा!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2018 10:32 AM2018-07-25T10:32:02+5:302018-07-25T10:34:58+5:30
लंडनचे माजी तेल व्यापाऱ्यांचा मुलगा रिचर्डने थ्रीडी प्रटेड पार्ट, विशेष इलेक्ट्रॉनिक आणि पाच जेट इंजिनचा वापर करून हा खासप्रकारचा हवेत उडणारा सूट तयार केला आहे.
आतापर्यंत आपण हॉलिवूडच्या सिनेमातच आयर्न मॅनला खासप्रकारचा सूट घालून उडताना पाहिले आहे. पण ब्रिटेनमध्ये खऱ्या आयुष्यातील 'आयर्न मॅन' सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. एक खास सूट परिधान करून रिचर्ड ब्राउनिंग हा पाहता पाहता हवेत उडू लागतो.
लंडनचे माजी तेल व्यापाऱ्यांचा मुलगा रिचर्डने थ्रीडी प्रटेड पार्ट, विशेष इलेक्ट्रॉनिक आणि पाच जेट इंजिनचा वापर करून हा खासप्रकारचा हवेत उडणारा सूट तयार केला आहे. हा सूट कसा उडवायचा याचं ट्रेनिंग घेतल्याशिवाय कुणीही हा सूट उडवू शकत नाही. हा सूट आता विक्रीसाठीही उपलब्ध असून या सूटसाठी ग्राहकांना ३.०४ कोटी रूपयांची किंमत चुकवावी लागेल.
ब्राउनिंगचे वडील सुद्धा एक एरोनॉटिकल इंजिनिअर आहेत. तर त्याचे आजोबा फायटर विमानाचे पायलट होते. इतकेच नाही तर त्याची आजीही हेलिकॉप्टर तयार करणारी कंपनी चालवत होती. या सूट तयार करण्याची सुरूवात ब्राउनिंगने केवळ टाइमपास म्हणून केली होती. नंतर आयर्न मॅन सिनेमाची लोकप्रियता पाहता त्याने हा सूट गंभीरतेने तयार करायला सूरुवात केली. नोकरीवरून घरी आल्यावर तो या सूटवर काम करायचा. गेल्यावर्षी त्याने या कंपनीची सुरूवात केली.
गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव
रिचर्ड ब्राउनिंगचं नाव या खास सूटमुळे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवलं गेलं आहे. हा सूट ५१ किमी प्रति तासाच्या वेगाने उडू शकतो आणि १२ हजार फूट उंचीपर्यंत जाऊ शकतो. आता ज्यांना अशाप्रकारचा सूट परिधान करून आयर्न मॅनसारखे उडायची इच्छा असेल तर त्यांची इच्छा पूर्ण होणार आहे. पण हा सूट परिधान करून उडण्यासाठी तुम्हाला ट्रेनिंग घेण्याची गरज आहे.