Realme 6 pro, Realme 6 आणि Realme Band लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2020 04:25 PM2020-03-05T16:25:08+5:302020-03-05T16:29:44+5:30

Corona Virus कोरोना व्हायरसमुळे कंपनीने इव्हेंट रद्द करत ऑनलाईन लाँचिंग केले आहे.

Realme 6 pro, Realme 6 and Realme Band launched, see pricing and features hrb | Realme 6 pro, Realme 6 आणि Realme Band लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

Realme 6 pro, Realme 6 आणि Realme Band लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

Next
ठळक मुद्देया फोनमध्ये भारतीय नेव्हीगेशन सिस्टिम नाविकही मिळणार आहे.फोन लाईटनिंग ब्लू आणि ऑरेंज कलर व्हेरिएंटमध्ये उपलब्ध असेल.दोन्ही फोनची बॅटरी चार्ज करण्यासाठी 30 वॉटचा फास्ट चार्जर मिळणार आहे.

चीनची स्मार्टफोन निर्माता कंपनी रियलमीने भारतात Realme 6 श्रेणी सुरू केली आहे. रिअलमी 6 सिरीज अंतर्गत कंपनीने रिअलमी 6 प्रो आणि रिअलमी 6 स्मार्टफोन सादर केले आहेत. या दोन फोनशिवाय कंपनीने रिअलमी बँडसुद्धा सादर केला आहे. कोरोना व्हायरसमुळे कंपनीने इव्हेंट रद्द करत ऑनलाईन लाँचिंग केले आहे.


रिअलमी 6 प्रोमध्ये 6.6 इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले देण्यात येणार आहे. याशिवाय या फोनमध्ये भारतीय नेव्हीगेशन सिस्टिम नाविकही मिळणार आहे. हा फोन लाईटनिंग ब्लू आणि ऑरेंज कलर व्हेरिएंटमध्ये उपलब्ध असेल. या फोनमध्ये चार रिअर कॅमेरे देण्यात आले आहेत. यामध्ये एक लेन्स 64 मेगापिक्सल, दुसरी 8 मेगापिक्सल अल्ट्रा वाईड, तिसरा दोन मेगापिक्सलचा मॅक्रो आणि चौथा 8 मेगापिक्सलचा टेलिफोटो लेन्स आहे. 


या फोनमध्ये इन डिस्प्ले ड्युअल फ्रंट कॅमेरा असून मुख्य कॅमेरा 16 मेगापिक्सल आणि दुसरा 8 मेगापिक्सल वाईड अँगल कॅमेरा आहे. या फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 720 जी प्रोसेसर देण्यात आला आहे. या फोनमध्ये 4300 एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. या फोनच्या पॉवर बटनावरच फिंगर प्रिंट सेन्सर असणार आहे. 


रिअलमी 6 मध्ये 5.3 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. दोन्ही फोनची बॅटरी चार्ज करण्यासाठी 30 वॉटचा फास्ट चार्जर मिळणार आहे. 
Realme Band कंपनीचा पहिला स्मार्ट बँड आहे. यामध्ये 2.4 cm कलर डिस्प्ले मिळणार आहे. यामध्ये 5 डायल फेस मिळणार. तसेच यामध्ये 9 स्पोर्टस मोड देण्यात आले आहेत. बँडमध्ये हार्ट रेट मॉनिटरशिवाय स्मार्ट नोटिफिकेशन, स्लीप मॉनिटरिंग मिळणार आहे. या बँडमध्ये वॉटरप्रूफ आणि डस्टप्रूफ IP68 ची रेटिंग मिळणार आहे. यामध्ये चार्जिंगसाठी युएसबी पोर्ट आहे. ज्याच्या मदतीने तुम्ही एडाप्टर चार्ज करू शकता. 


रिअलमी बँडची किंमत 1499 रुपये असून याची विक्री अमेझॉनवर सुरू झाली आहे. तर Realme 6 Pro ची किंमत 16,999 ते 18999 रुपये आहे. Realme 6 ची किंमत 12999 ते 15999 रुपये आहे. या दोन्ही फोनची विक्री फ्लिपकार्टवर केली जाणार आहे. 

Web Title: Realme 6 pro, Realme 6 and Realme Band launched, see pricing and features hrb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.