Realme 8, Realme 8 Pro च्या प्री-बुकींगला सुरूवात; पाहा किती रूपयांत आणि कसा कराल फोन बुक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2021 07:17 PM2021-03-15T19:17:33+5:302021-03-15T19:19:24+5:30

Realme Smartfones : हे दोन्ही स्मार्टफोन 24 मार्च रोजी होणार लाँच, Realme 8 Pro हा कंपनीचा पहिला 108 मेगापिक्सेल कॅमेरा असलेला ठरणार फोन

Realme 8 Realme 8 Pro pre order in India starts from monday heres what you need to know | Realme 8, Realme 8 Pro च्या प्री-बुकींगला सुरूवात; पाहा किती रूपयांत आणि कसा कराल फोन बुक

Realme 8, Realme 8 Pro च्या प्री-बुकींगला सुरूवात; पाहा किती रूपयांत आणि कसा कराल फोन बुक

googlenewsNext
ठळक मुद्देRealme 8 Pro हा कंपनीचा पहिला 108 मेगापिक्सेल कॅमेरा असलेला ठरणार फोनहे दोन्ही स्मार्टफोन 24 मार्च रोजी होणार लाँच

Realme 8 आणि Realme 8 Pro हे दोन स्मार्टफोन येत्या 24 मार्च रोजी लाँच होणार आहेत. यापूर्वीच Realme इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी माधव सेठ यांनी या स्मार्टफोनचा फर्स्ट लूक आपल्या ट्विटर अकाऊंचवरून दाखवला होता. आता लाँचपूर्वीच कंपनीनं Realme Infinity Sale ची घोषणा केली आहे. यामध्ये ग्राहकांना Realme 8 आणि Realme 8 Pro हे दोन स्मार्टफोन्स बुक करता येणार आहेत. या स्मार्टफोन्सची प्री-बुकींग 15 मार्च ते 22 मार्च दरम्यान सुरू राहणार आहे. 

या सेल अंतर्गत ग्राहकांना लाँचपूर्वीच हे स्मार्टफोन्स बुक करता येणार आहे. हा सेल फ्लिपकाट Flipkart आणि Realme.com या वेबसाईट्सवर सुरू करण्यात आला आहे. यासाठी ग्राहकांना सुरुवातीला केवळ 1080 रूपये भरावे लागतील. तसंच या स्मार्टफोन्सचं प्री-बुकींग करणाऱ्या ग्राहकांना कंपनी एक गिफ्टही देणार आहे. जर तुम्हाला बुकींग नंतर ती ऑर्डर रद्द करायची असेल तर तुम्ही भरलेले पैसेही परत करण्यात येतील. 

काय असतील फीचर्स

 Realme 8 Pro हा कंपनीचा पहिला स्मार्टफोन असेल ज्यामध्ये 108 मेगापिक्सेल कॅमेरा देण्यात आला आहे. हा कॅमेरा सॅमसंग HM2 या प्रायमरी कॅमेरा सेन्सरसोबत येणार आहे. 108 मेगापिक्सेल कॅमेऱ्या व्यतिरिक्त Realme 8 Pro मध्ये ऑल न्यू सेन्स झूम टेक्नॉलॉजीची सुविधाही असणार आहे. यामध्ये 3x झूम करता येईल. तसंच हा सेन्सर जुन्या ऑप्टीकल झूम लेन्सपेक्षा अधिक चांगला असा दावा कंपनीनं केला आहे. तसंच Realme 8 सीरिजमध्ये स्टाररी मोडसोबत एक अपडेट येणार आहे. तसंच यानंतर टाईम लॅप्स व्हिडीओ तयार करण्याचाही ऑप्शन मिळेल. 

याव्यतिरिक्त या स्मार्टफोनमध्ये नियो पोट्रेट, डायनॅमिक बोकेह पोट्रेट आणि AI कलर पोट्रेटचा सपोर्ट दिला आहे. या स्मार्टफोनची इमेज प्रोसेसिंगही जलद असणार असल्याचं सांगण्यात येत आहे. Realme 8 Pro चा कॅमेरा 12 मेगापिक्सेलचे ८ फोटो घेऊन तो एकत्र जोडेल. यामुळे फोटोमध्ये उत्तम क्लॅरिटी मिळेल. तसंच फोनमध्ये Starry टाईम लॅप्स व्हिडीओ मोड देण्यात आला आहे. यामध्ये 4 सेकंदात 15 फोटो एकत्र करता येणार असल्याचंही कंपनीनं म्हटलं आहे. याव्यतिरिक्त यात 30fps चा टाईम लॅप्स व्हिडीओचा सपोर्टही मिळेल.
 

 

Web Title: Realme 8 Realme 8 Pro pre order in India starts from monday heres what you need to know

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.