जबरदस्त 11GB रॅमसह Realme 8i 4G भारतात सादर; 50MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरीसह येणार बाजारात 

By सिद्धेश जाधव | Published: September 9, 2021 03:27 PM2021-09-09T15:27:22+5:302021-09-09T15:31:21+5:30

Realme 8i Price: रियलमीने एका व्हर्च्युअल इव्हेंटच्या माध्यमातून देशात चार डिवाइस सादर केले आहेत. यात Realme 8s 5G आणि Realme 8i 4G चा समावेश आहे.  

Realme 8i 4g with mediatek helio g96 soc 50mp camera 5000mah battery launched in india  | जबरदस्त 11GB रॅमसह Realme 8i 4G भारतात सादर; 50MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरीसह येणार बाजारात 

जबरदस्त 11GB रॅमसह Realme 8i 4G भारतात सादर; 50MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरीसह येणार बाजारात 

Next
ठळक मुद्देरियलमी 8i स्मार्टफोनचे दोन व्हेरिएंट भारतात सादर करण्यात आले आहेत.Realme 8i मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो.

रियलमीने आज दोन स्मार्टफोन, एक टॅबलेट आणि एक पोर्टेबल ब्लूटूथ स्पीकर भारतात सादर केला आहे. कंपनीने आपल्या Realme 8 सीरीजमध्ये Realme 8s 5G आणि Realme 8i 4G असे दोन स्मार्टफोन्स सादर केले आहेत. यातील Realme 8i स्मार्टफोन 5000mAh बॅटरी, 50MP कॅमेरा अश्या अनेक दमदार फीचरसह बाजारात आला आहे. हा MediaTek Helio G96 प्रोसेसरसह येणारा पहिला स्मार्टफोन आहे.  

Realme 8i ची किंमत  

रियलमी 8i स्मार्टफोनचे दोन व्हेरिएंट भारतात सादर करण्यात आले आहेत. या फोनचा 4GB RAM आणि 64GB स्टोरेज असलेला फोन 13,999 रुपयांमध्ये सादर झाला आहे. तर 6GB RAM आणि 128GB स्टोरेजसाठी 15,999 रुपये मोजावे लागतील. हा फोन Space Purple आणि Space Black रंगात 14 सप्टेंबरपासून Flipkart आणि Realme.com वर विकत घेता येईल.  

Realme 8i  

Realme 8i स्मार्टफोनमध्ये 6.6 इंचाचा एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेट आणि 2412 x 1080 पिक्सल रिजोल्यूशनला सपोर्ट करतो. हा स्मार्टफोन MediaTek Helio G96 चिपसेटसह बाजारात आला आहे. या फोनमध्ये 6GB पर्यंत RAM आणि 5GB पर्यंत व्हर्च्युअल रॅम मिळतो. तसेच फोनमध्ये 128GB पर्यंतची इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. फोन Android 11 ऑपरेटिंग सिस्टमवर आधारित Realme UI 2.0 वर चालतो. 

Realme 8i मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. यात 50MP चा मुख्य AI कॅमेरा देण्यात आला आहे. त्याचबरोबर फोनमध्ये एक B&W लेन्स आणि 2MP चा मॅक्रो सेन्सर देण्यात आला आहे. फोनमधील सेल्फी कॅमेरा 16MP चा आहे. कनेक्टिविटीसाठी या फोनमध्ये Wi-Fi, Bluetooth 5.0, 3.5mm ऑडियो जॅक असे ऑप्शन मिळतात. सिक्योरिटीसाठी या फोनमध्ये साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर दिला आहे. या स्मार्टफोनमधील 5000mAh ची बॅटरी 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.  

Web Title: Realme 8i 4g with mediatek helio g96 soc 50mp camera 5000mah battery launched in india 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.