रियलमीचे दोन स्वस्त स्मार्टफोन लवकरच येणार भारतात; जाणून घ्या Realme 8i आणि Realme 8s चे फीचर्स
By सिद्धेश जाधव | Published: August 4, 2021 01:01 PM2021-08-04T13:01:32+5:302021-08-04T13:03:14+5:30
Realme 8i & Realme 8s India launch: माधव सेठ यांनी सांगितले आहे कि कंपनी लवकरच भारतात Realme 8i आणि Realme 8s नावाचे दोन नवीन स्मार्टफोन लाँच करणार आहे.
रियलमी भारतात आपल्या Realme 8 सीरिजमध्ये Realme 8i आणि Realme 8s स्मार्टफोन लाँच करणार आहे, अशी बातमी गेल्या महिन्यात आली होती. आता या बातमीला कंपनीने दुजोरा दिला आहे. AskMadhav सीरीजच्या नवीन भागात रियलमी इंडियाचे सीईओ माधव सेठ यांनी सांगितले आहे कि कंपनी लवकरच भारतात Realme 8i आणि Realme 8s नावाचे दोन नवीन स्मार्टफोन लाँच करणार आहे. या भागात त्यांनी अचूक तारखेचा उल्लेख केला नाही.
Realme 8S चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स
रियलमी 8एस स्मार्टफोनमध्ये 90हर्ट्ज रिफ्रेश रेटसह 6.5 इंचाचा डिस्प्ले दिला जाऊ शकतो. या फोनमध्ये मीडियाटेकचा डायमनसिटी 810 चिपसेट 5G कनेक्टीव्हीसह दिला जाऊ शकतो. हा फोन 8GB पर्यंत रॅम आणि 256GB पर्यंतची स्टोरेज मिळू शकते. हा नवीन रियलमी फोन अँड्रॉइड 11 आधारित रियलमी युआय 2.0 सह येईल.
Realme 8s मधील ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपमध्ये एलईडी फ्लॅशसह 64 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा दिला जाऊ शकतो. या फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो. तसेच या रियलमी फोनमधील 5,000एमएएचची बॅटरी 33वॉट डार्ट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल.
Realme 8i चे स्पेसिफिकेशन्स
Realme 8i टेना वर 6.43 इंचाच्या मोठ्या डिस्प्लेसह लिस्ट करण्यात आला होता. यात इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर असल्यामुळे हा एक अॅमोलेड पॅनल असू शकतो. लिस्टिंगनुसार या फोनचा आकार 158.5 x 73.3 x 8.4एमएम असेल. हा फोन अँड्रॉइड 11 ओएस वर चालू शकतो. या ड्युअल सिम फोनमध्ये 4,400एमएएच बॅटरी दिली जाऊ शकते