50MP कॅमेऱ्यासह येणार रियलमीचा बजेट स्मार्टफोन; जाणून घ्या Realme 8i ची वैशिष्ट्ये
By सिद्धेश जाधव | Published: August 25, 2021 11:37 AM2021-08-25T11:37:42+5:302021-08-25T11:38:52+5:30
Realme 8i India Launch: आत कंपनी अजून दोन स्वस्त स्मार्टफोन Realme 8i आणि Realme 8s सादर करण्याची तयारी करत आहे.
नुकताच भारतात रियलमीचा स्वस्त स्मार्टफोन Realme C21Y सादर करण्यात आला आहे. आत कंपनी अजून दोन स्वस्त स्मार्टफोन Realme 8i आणि Realme 8s सादर करण्याची तयारी करत आहे. याआधी देखील लिक्स आणि रिपोर्ट्समधून या दोन स्मार्टफोन्सच्या माहिती मिळाली आहे. परंतु आता रियलमी 8आयचे स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत. तसेच Onleaks आणि Digit ने मिळून सादर केलेल्या फोनच्या रेंडर ईमेजमधून लूक आणि डिजाईनची माहिती देखील मिळाली आहे.
Realme 8i ची डिजाईन
रियलमी 8आय स्मार्टफोन प्लॉस्टिक बॉडीसह बाजारात येईल. या फोनमधील डिस्प्लेच्या तिन्ही कडा बेजललेस असतील तर खालच्या बाजूला रुंद चीन पार्ट असेल. या फोनमध्ये सेल्फी कॅमेऱ्यासाठी एक पंच-होल वरच्या बाजूला डावीकडे देण्यात येईल. फोनच्या मागे चौरसाकृती रियर कॅमेरा सेटअप देण्यात येईल, ज्यात एलईडी फ्लॅशसह तिने कॅमेरे असतील. सिक्योरिटीसाठी फोनमध्ये मिळणार फिंगरप्रिंट सेन्सर साईड पॅनलवर देण्यात आला आहे.
Realme 8i चे स्पेसिफिकेशन्स
रियलमी 8आय स्मार्टफोनमध्ये 6.59 इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले 120हर्ट्ज रिफ्रेश रेटसह देण्यात येईल. या फोनमध्ये ऑक्टकोर प्रोसेसरसह MediaTek Helio G96 चिपसेट आणि माली जी57 एमसी2 जीपीयू देण्यात येईल. हा रियलमी फोन अँड्रॉइड 11 आधारित रियलमी युआयवर चालेल. त्याचबरोबर 4 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात येईल.
रियलमी 8आय मधील ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपमध्ये 50 मेगापिक्सलचा मुख्य सेन्सर, 2 मेगापिक्सलची पोर्टरेट लेन्स आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स देण्यात येईल. तसेच हा स्मार्टफोन 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करेल. Realme 8i मध्ये 5,000एमएएचची मोठी बॅटरी मिळू शकते.