रियलमी लाँच करणार जगातील पहिला MediaTek Dimensity 810 चिपसेट असलेला 5G फोन; कंपनीने केली घोषणा  

By सिद्धेश जाधव | Published: August 12, 2021 12:50 PM2021-08-12T12:50:52+5:302021-08-12T12:57:51+5:30

Realme 8s 5G Specs: स्मार्टफोन चिपसेट निर्माता मीडियाटेकने आपल्या नवीन 5G चिपसेट Dimensity 810 ची घोषणा केली आहे. Realme 8s या चिपसेटसह येणारा जगातील सर्वात पहिला स्मार्टफोन असू शकतो.  

Realme 8s 5G India Launch with MediaTek Dimensity 810 SoC soon  | रियलमी लाँच करणार जगातील पहिला MediaTek Dimensity 810 चिपसेट असलेला 5G फोन; कंपनीने केली घोषणा  

हा प्रतीकात्मक फोटो आहे

Next
ठळक मुद्देस्मार्टफोन चिपसेट निर्माता मीडियाटेकने कालच आपल्या नवीन 5G चिपसेट Dimensity 810 ची घोषणा केली आहे. Realme 8s या चिपसेटसह येणारा जगातील सर्वात पहिला स्मार्टफोन असू शकतो.  

Realme लवकरच भारतात दोन स्वस्त स्मार्टफोन लाँच करणार आहे. हे फोन ‘रियलमी 8 सीरीज’ मध्ये Realme 8i आणि Realme 8s नावाने सादर केले जातील, असे संकेत कंपनीचे सीईओ माधव सेठ यांनी काही दिवसांपूर्वी दिले होते. आज माधव सेठ यांनी या बातमीवर शिक्कामोर्तब केला आहे. सेठ यांनी ट्वीट करून सांगितले आहे कि रियलमी 8एस स्मार्टफोन कालच लाँच झालेल्या MediaTek Dimensity 810 5G चिपसेटसह लाँच केला जाऊ शकतो. 

स्मार्टफोन चिपसेट निर्माता मीडियाटेकने कालच आपल्या नवीन 5G चिपसेट Dimensity 810 ची घोषणा केली आहे. या घोषणेला रिप्लाय करून माधव सेठ यांनी सांगितले कि Realme या चिपसेटसह पहिला स्मार्टफोन सादर करणार आहे. डायमनसिटी 810 चिपसेट 6नॅनोमीटर फॅब्रिकेशन टेक्नॉलॉजीने बनला आहे आणि हा चिपसेट ड्युअल मोड 5जी बॅंडला सपोर्ट करतो. Realme 8s या चिपसेटसह येणारा जगातील सर्वात पहिला स्मार्टफोन असू शकतो.  

Realme 8s चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स 

रियलमी 8एस स्मार्टफोनमध्ये 90हर्ट्ज रिफ्रेश रेटसह 6.5 इंचाचा डिस्प्ले दिला जाऊ शकतो. या फोनमध्ये मीडियाटेकचा डायमनसिटी 810 चिपसेट 5G कनेक्टीव्हीसह दिला जाऊ शकतो. हा फोन 8GB पर्यंत रॅम आणि 256GB पर्यंतची स्टोरेज मिळू शकते. हा नवीन रियलमी फोन अँड्रॉइड 11 आधारित रियलमी युआय 2.0 सह येईल.   

Realme 8s मधील ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपमध्ये एलईडी फ्लॅशसह 64 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा दिला जाऊ शकतो. या फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो. तसेच या रियलमी फोनमधील 5,000एमएएचची बॅटरी 33वॉट डार्ट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. या फोनची प्रारंभिक किंमत 15,000 रुपयांच्या आसपास असू शकते. 

Web Title: Realme 8s 5G India Launch with MediaTek Dimensity 810 SoC soon 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.