64MP कॅमेरा, 13GB रॅम असलेल्या फोनवर 1,500 रुपयांची सूट; Realme 8s 5G आजपासून खरेदीसाठी उपलब्ध 

By सिद्धेश जाधव | Published: September 13, 2021 11:33 AM2021-09-13T11:33:29+5:302021-09-13T11:41:50+5:30

Realme 8s price in India: आज दुपारी 12 वाजल्यापासून Realme 8s 5G स्मार्टफोन भारतात खरेदीसाठी उपलब्ध होणार आहे. हा फोन Flipkart, Realme.com आणि ऑफलाईन रीटेल स्टोर्सच्या माध्यमातून विकत घेता येईल. 

Realme 8s to go on first sale today on flipkart with rs 1500 discount | 64MP कॅमेरा, 13GB रॅम असलेल्या फोनवर 1,500 रुपयांची सूट; Realme 8s 5G आजपासून खरेदीसाठी उपलब्ध 

64MP कॅमेरा, 13GB रॅम असलेल्या फोनवर 1,500 रुपयांची सूट; Realme 8s 5G आजपासून खरेदीसाठी उपलब्ध 

Next
ठळक मुद्देRealme 8s 5G स्मार्टफोन भारतात दोन व्हेरिएंटमध्ये सादर करण्यात आला आहे. Realme 8S 5G जगातील पहिला MediaTek Dimensity 810 SoC असलेला फोन आहे

Realme 8s 5Gस्मार्टफोन भारतात आजपासून खरेदीसाठी उपलब्ध होणार आहे. हा मीडियाटेक डायमेनसिटी 810 सह बाजारात आलेला जगातील सर्वात पहिला स्मार्टफोन आहे. या फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी आणि 64MP रियर कॅमेरा असे दमदार स्पेसिफिकेशन्स देण्यात आले आहेत. रियलमी 8एस 5जी स्मार्टफोन आज दुपारी 12 वाजल्यापासून Flipkart, Realme.com आणि ऑफलाईन रीटेल स्टोर्सच्या माध्यमातून विकत घेता येईल.  

Realme 8s 5G price in India 

Realme 8s 5G स्मार्टफोन भारतात दोन व्हेरिएंटमध्ये सादर करण्यात आला आहे. फोनचा 6GB RAM आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंट 17,999 रुपयांमध्ये उपलब्ध होणार आहे. तर या फोनचा मोठा व्हेरिएंट ज्यात 8GB RAM व  128GB स्टोरेज आहे तो 19,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. रियलमी 8एस 5जी फोन HDFC आणि ICICI बँकेच्या क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड व ईएमआय ट्रँजॅक्शनच्या माध्यमातून विकत घेतल्यास 1,500 रुपयांची सूट देण्यात येईल.  

Realme 8S 5G चे स्पेसिफिकेशन्स   

Realme 8S 5G जगातील पहिला MediaTek Dimensity 810 SoC असलेला फोन आहे. प्रोसेसरसह कंपनीने ग्राफिक्ससाठी Mali-G57 MC2 जीपीयू दिला आहे. तसेच हा फोन 8GB पर्यंतच्या LPDDR4x RAM आणि 128GB UFS 2.2 स्टोरेजला सपोर्ट करतो. कंपनीने या फोनमध्ये 5GB अतिरिक्त व्हर्च्युअल रॅम देखील दिला आहे. कनेक्टिव्हिटीसाठी या फोनमध्ये 2.4GHz/5.1GHz/5.8GHz WiFi, 802.11 a/b/g/n/ac आणि Bluetooth 5.1 असे ऑप्शन्स मिळतात.   

Realme 8S 5G मध्ये 6.5-इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले मिळतो. हा पांडा ग्लासच्या सुरक्षेसह येणारा हा डिस्प्ले 90Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात 64 मेगापिक्सलचा अल्ट्रा HD मेन कॅमेरा, 2 मेगापिक्सलची B&W पोर्टेट लेन्स आणि 2 मेगापिक्सलची 4cm मॅक्रो लेन्स देण्यात आली आहे. हा 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. Realme 8s 5G मध्ये पावर बॅकअपसाठी कंपनीने 5000mAh ची बॅटरी 33 वॉट डार्ट फास्ट चार्जिंग सपोर्टसह देण्यात आली आहे.   

Web Title: Realme 8s to go on first sale today on flipkart with rs 1500 discount

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.