‘या’ कंपनीनं केली कमाल; 15 हजारांच्या आत 11GB RAM सह 5G Phone भारतात लाँच
By सिद्धेश जाधव | Published: March 10, 2022 05:38 PM2022-03-10T17:38:48+5:302022-03-10T17:39:54+5:30
Realme 9 5G स्मार्टफोन देशात 11GB RAM, 90Hz रिफ्रेश रेट, 48MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरीसह आला आहे.
Realme नं आज भारतात आपल्या Realme 9 सीरिज अंतर्गत Realme 9 5G आणि Realme 9SE 5G नावाचे दोन स्मार्टफोन सादर केले आहेत. यातील Realme 9 5G स्मार्टफोन देशात 11GB RAM, 90Hz रिफ्रेश रेट, 48MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरीसह आला आहे. हा फोन 15 हजारांच्या बजेटमध्ये रेडमीला चांगली टक्कर देऊ शकतो.
Realme 9 5G चे स्पेसिफिकेशन्स
रियलमी 9 5जी फोन भारतात 6.5 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेसह आला आहे. जो पंच-होल डिजाईनसह 90हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. हा फोन अँड्रॉइड 11 ओएस बेस्ड रियलमी वनयुआयवर चालतो. प्रोसेसिंगसाठी यात मीडियाटेक डिमेनसिटी 810 चिपसेट देण्यात आला आहे. सोबत 6GB पर्यंत फिजिकल रॅम आणि 5जीबी वचुर्अल रॅम मिळून 11GB रॅम मिळतो. कंपनीनं यात 128GB पर्यंत स्टोरेज दिली आहे.
फोटोग्राफीसाठी यात ट्रिपल रियर कॅमेरा मिळतो. ज्यात एलईडी फ्लॅशसह 48 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, ब्लॅक अँड व्हाईट पोर्टरेट कॅमेरा आणि मॅक्रो लेन्स मिळते. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्ससह सिक्योरिटीसाठी साईड फिंगरप्रिंट सेन्सर आहे. पावर बॅकअपसाठी या फोनमध्ये 5,000एमएएच बॅटरी देण्यात आली आहे.
Realme 9 5G ची किंमत
रियलमी 9 5जी फोनच्या 4 जीबी रॅम आणि 64 जीबी इंटरनल स्टोरेजची किंमत 14,999 रुपये आहे. तर 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 17,499 रुपये ठेवण्यात आली आहे. हा मोबाईल 14 मार्चपासून Black आणि White कलरमध्ये विकत घेता येईल.
हे देखील वाचा:
- iPhone 13 Mini वर मोठा डिस्काउंट; किफायतशीर आयफोनला देखील देतोय टक्कर
- सावधान! 'या' अँड्रॉइड स्मार्टफोन्सना हॅकिंगचा धोका! Samsung युजर्ससाठी धोक्याची घंटा, असा करा बचाव
- कमालच! लाँचच्या आधीच रिटेलरनं सुरु केली स्वस्त Xiaomi फोनची विक्री; कंपनीनं केलं हे...