Realme चा Pro लेव्हल 5G Phone येतोय बाजारात; लाँच पूर्वीच पाहा डिजाइन आणि स्पेसिफिकेशन्स
By सिद्धेश जाधव | Published: January 15, 2022 12:48 PM2022-01-15T12:48:56+5:302022-01-15T12:49:23+5:30
Realme 9 Pro 5G Phone: Realme 9 Pro स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 695 प्रोसेसरसह सादर केला जाऊ शकतो. जो एक 5G प्रोसेसर आहे.
Realme 9 Pro 5G Phone: Realme 9 सीरीज येत्या 18 जानेवारीला भारतात पदार्पण करणार आहे. कंपनी याची सुरुवात Realme 9i च्या लाँचपासून करणार आहे. परंतु या सीरिजमध्ये हा एकमेव स्मार्टफोन नसेल. लवकरच Realme 9 आणि Realme 9 Pro देखील जागतिक बाजारात येतील. आता SmartPrix आणि OnLeaks यांनी मिळून सीरिजमधील Realme 9 Pro स्मार्टफोनचे रेंडर व स्पेसिफिकेशन्स शेयर केले आहेत.
Realme 9 Pro ची डिजाईन
Realme 9 Pro मध्ये पंच होल असलेला डिस्प्ले मिळेल. मागे आयताकृती कॅमेरा मॉड्यूल देण्यात येईल ज्यात LED फ्लॅशसह ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळेल. स्लिम बेजलसह येणाऱ्या फोनच्या तळाला स्पिकर ग्रील, मायक्रोफोन आणि टाईप सी पोर्ट दिसत आहे. फोनच्या डावीकडे व्हॉल्युम बटन व सिम ट्रे आहे तर उजवीकडे पॉवर बटन मिळतो.
Realme 9 Pro चे लीक स्पेसिफिकेशन्स
Realme 9 Pro स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 695 प्रोसेसरसह सादर केला जाऊ शकतो. जो एक 5G प्रोसेसर आहे. सोबत कंपनी ग्राफिक्ससाठी Adreno 619 GPU देऊ शकते. रॅम आणि स्टोरेजची माहिती मात्र अजून मिळाली नाही. सिक्योरिटीसाठी यात इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर दिला जाईल. तर पॉवर बॅकअपची जबाबदारी 5000mAh च्या बॅटरीवर असेल. जी 33W किंवा 65W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येईल.
Realme 9 Pro स्मार्टफोनमध्ये 6.59-इंचाचा फुल एचडी+ डिस्प्ले मिळेल. हा AMOLED डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेटसह बाजारात येईल. या Realme स्मार्टफोनमध्ये 64MP चा प्रायमरी रियर कॅमेरा मिळेल. सोबत 8MP चा अल्ट्रा-वाईड अँगल सेन्सर आणि 2MP चा थर्ड कॅमेरा मिळेल. फोनमध्ये सेल्फीसाठी 16MP चा फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो.
हे देखील वाचा:
नेटवर्क नसल्याची 'पोस्ट' करण्यापेक्षा अशी करा कॉल ड्रॉपची तक्रार; कंपनीला होऊ शकतो लाखोंचा दंड