केएल राहुलच्या हातात दिसला Realme 9 Pro चा ब्लू कलर व्हेरिएंट; फोनमध्ये 64MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरी 

By सिद्धेश जाधव | Published: February 1, 2022 11:47 AM2022-02-01T11:47:01+5:302022-02-01T11:49:17+5:30

Realme 9 Pro Price: लवकरच भारतात Realme 9 Pro आणि Realme 9 Pro+ लाँच होणार आहेत. यातील वॅनिला व्हर्जन आता भारतीय क्रिकेटर KL Rahul च्या हातात दिसला आहे.  

Realme 9 Pro Blue Color Variant Seen In Kl Rahul Hand May Launch Soon In India  | केएल राहुलच्या हातात दिसला Realme 9 Pro चा ब्लू कलर व्हेरिएंट; फोनमध्ये 64MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरी 

केएल राहुलच्या हातात दिसला Realme 9 Pro चा ब्लू कलर व्हेरिएंट; फोनमध्ये 64MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरी 

Next

Realme लवकरच आपल्यात स्मार्टफोन पोर्टफोलिओचा विस्तार करणार आहे. कंपनी आपल्या Realme 9 सीरिज अंतर्गत 9 Pro आणि 9 Pro+ हे दोन स्मार्टफोन याच महिन्यात देशात सादर करणार आहे. आता यातील Realme 9 Pro चा ब्लू कलर व्हेरिएंट भारतात कथितरित्या दिसला आहे. 91Mobiles च्या रिपोर्टनुसार, हा स्मार्टफोन भारतीय क्रिकेट स्‍टार केएल राहुलच्या हातात दिसला आहे.  

रिपोर्टनुसार, इलेक्ट्रिक आणि व्हायब्रँट ब्‍लू कलरमध्ये Realme 9 Pro येण्याची शक्यता आहे. तसेच इमेजनुसार हा फोन ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह सादर केला जाईल. याआधी टिपस्टर OnLeaks नं देखील या फोनच्या ऑरोरा ग्रीन, मिडनाइट ब्लॅक आणि सनराईज ब्लू कलर व्हेरिएंटची माहिती दिली होती.  

Realme 9 Pro लीक स्पेसिफिकेशन्स  

Realme 9 Pro मध्ये Qualcomm Snapdragon 695 प्रोसेसर मिळू शकतो. हा फोन 8GB पर्यंत RAM सह येईल सोबत 5GB व्हर्च्युअल रॅम मिळेल म्हणजे एकूण रॅम 13GB पर्यंत जाऊ शकतो. फोनमध्ये 128GB ची इंटरनल स्टोरेज मिळेल. ही स्टोरेज वाढवण्यासाठी मायक्रो एसडी कार्ड सपोर्ट मिळेल. हा स्मार्टफोन Android 11 बेस्ड Realme UI वर चालेल. यात कनेक्टिविटीसाठी Wi-Fi 6, Bluetooth 5.0, USB Type C, 3.5mm जॅक, NFC आणि GPS असे अनेक ऑप्शन मिळतील.  

Realme 9 Pro मध्ये 6.6 इंचचा फुल एचडी+ Super AMOLED डिस्प्ले मिळेल. जो 120Hz रिफ्रेश रेट, 399ppi पिक्सल डेन्सिटी आणि HDR10 सह बाजारात येईल. या रियलमी फोनच्या बॅक पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळेल. ज्यात 64MP चा प्रायमरी कॅमेरा, 8MP चा अल्ट्रा वाईड अँगल सेन्सर आणि 2MP चा मॅक्रो सेन्सर असेल. तर फोनच्या फ्रंटला 16MP चा सेल्फी शुटर मिळेल. तसेच यातील 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट असलेली 5000mAh ची बॅटरी पॉवर बॅकअप देईल.   

हे देखील वाचा:

OnePlus 10 Pro नव्हे तर OnePlus 10 Ultra असेल कंपनीचा सर्वात पॉवरफुल स्मार्टफोन; जाणून घ्या वैशिष्ट्ये

बंद असलेला फोन देखील करता येईल ट्रॅक; Smartphone हरवल्यास वापरा या सोप्प्या ट्रिक्स

Web Title: Realme 9 Pro Blue Color Variant Seen In Kl Rahul Hand May Launch Soon In India 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.