स्मार्टवॉचवर पैसे खर्च करण्याची गरज नाही; Realme चा स्मार्टफोनच सांगणार युजरचा हार्ट रेट
By सिद्धेश जाधव | Published: February 2, 2022 11:58 AM2022-02-02T11:58:26+5:302022-02-02T11:58:47+5:30
Realme 9 Pro+ Heart Rate Sensor: Realme 9 Pro+ स्मार्टफोन हार्ट रेट सेन्सरसह बाजारात येईल. हा जगातील पहिला स्मार्टफोन असेल जो या फिचरसह बाजारात येईल.
Realme 9 Pro Series अंतर्गत भारतात लवकरच Realme 9 Pro आणि Realme 9 Pro+ हे दोन स्मार्टफोन कंपनी सादर करणार आहे. हे दोन्ही डिवाइस फेब्रुवारीमध्ये लाँच केले जाऊ शकतात. आता समोर आलेल्या नवीन बातमीनुसार, Realme 9 Pro+ फोनमध्ये हार्ट रेट सेन्सर देण्यात येईल. हा जगातील पहिला व्यावसायिक स्मार्टफोन असेल जो युजरच्या हृदयाची गती मोजेल, असा दावा कंपनीनं केला आहे.
Realme 9 Pro+ Heart Rate Sensor
रियलमीचे सीईओ माधव शेठ यांनी ट्विटरवरून या फिचरची माहिती दिली आहे. Realme 9 Pro+ स्मार्टफोनमध्ये हृदयाच्या ठोक्यांवर नजर ठेवणारा हार्ट रेट सेन्सर असेल. त्यांनी ट्वीट करून या फिचरचा एक डेमो व्हिडीओ देखील शेयर केला आहे. यासाठी हा स्मार्टफोन फोनमधील इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरचा वापर करेल. तुम्ही हे ट्वीट पुढे बघू शकता.
Keep a track of your health and be aware of it throughout the day.
— Madhav Sheth (@MadhavSheth1) February 1, 2022
Our upcoming #realme9Pro+ will feature a heart rate sensor. pic.twitter.com/K0vUoDaGl5
Realme 9 Pro+ ची लीक डिजाईन आणि स्पेक्स
Realme 9 Pro+ या सीरीजमधील सर्वात प्रीमिमय स्मार्टफोन असेल. या फोनमध्ये 6.43-इंचाचा फुल एचडी+ अॅमोलेड डिस्प्ले मिळेल, जो 90Hz रिफ्रेश रेटसह बाजारात येईल. हा एक फ्लॅट डिस्प्ले आहे आणि खूप स्लिम बेझलसह सादर केला जाईल. आणि यात पंचहोल कटआऊट मिळू शकतो.
रियलमीचा हा स्मार्टफोन Android 12 आधारित ColorOS 12 वर चालेल. हा फोन MediaTek Dimensity 920 SoC सह बाजारात येईल. सोबत 8GB पर्यंत रॅम आणि 256GB इंटरनल स्टोरेज मिळू शकतो शकते. पॉवर बॅकअपची जबाबदारी 4500mAh च्या बॅटरीवर असेल. या स्मार्टफोनमध्ये 50W फास्ट चार्जिंग दिली जाऊ शकते.
हा फोन ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह सादर केला जाईल. ज्यात 50MP चा प्रायमरी कॅमेरा दिला जाऊ शकतो. सोबत 8MP अल्ट्रावाईड लेन्स आणि 2MP मॅक्रो कॅमेरा सेन्सर दिला जाऊ शकतो. रियलमीच्या या फोनमध्ये 16MP चा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो. या मोबाईलचे ब्लॅक, अरोरा ग्रीन आणि सनराईज ब्लू कलर व्हेरिएंट बाजारात येऊ शकतात.
हे देखील वाचा:
- 6000mAh पर्यंतची बॅटरी असलेले हे Redmi फोन्स देतील दिवसभराचा बॅकअप; किंमत 12,500 पासून सुरु
- 1-2 नव्हे तर 13 5G बँड्ससह येणार फाडू 5G Smartphone; लाँच होण्याआधीच दाखवला रियलमीला ठेंगा