Realme 9 Pro Series: Realme लाँच केला ‘Pro’ लेव्हल 5G Smartphone; 64MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरीसह भारतात लाँच

By सिद्धेश जाधव | Published: February 16, 2022 03:30 PM2022-02-16T15:30:22+5:302022-02-16T15:34:25+5:30

Realme 9 Pro Series: Realme नं भारतात Realme 9 Pro आणि Realme 9 Pro Plus हे दोन फोन्स प्रीमिमय मिड रेंजमध्ये सादर केले आहेत.  

Realme 9 pro launched know price in india and specs  | Realme 9 Pro Series: Realme लाँच केला ‘Pro’ लेव्हल 5G Smartphone; 64MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरीसह भारतात लाँच

Realme 9 Pro Series: Realme लाँच केला ‘Pro’ लेव्हल 5G Smartphone; 64MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरीसह भारतात लाँच

Next

Realme 9 Pro सीरीजचे दोन स्मार्टफोन भारतात Realme 9 Pro आणि Realme 9 Pro Plus नावाने सादर करण्यात आले आहेत. यातील Realme 9 Pro स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 695 5G चिपसेटसह प्रीमिमय मिड रेंजमध्ये सादर करण्यात आला आहे. ज्यात 64MP कॅमेरा, 5000mAh बॅटरी आणि 8GB रॅम देण्यात आला आहे.  

Realme 9 Pro चे स्पेसिफिकेशन्स 

Realme 9 Pro स्मार्टफोनमध्ये 6.59-इंचाचा फुलएचडी+ अ‍ॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. हा पंच होल डिस्प्ले 90Hz रिफ्रेश रेट आणि 180Hz टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. कंपनीनं याला कॉर्निंग गोरिल्ला ग्लासची सुरक्षा दिली आहे. या फोनमध्ये सिक्योरिटीसाठी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे.  

Realme 9 Pro फोन अँड्रॉइड 12 आधारित Realme UI 3.0 वर चालतो. यात क्वॉलकॉमच्या Snapdragon 695 5G चिपसेटची सुरक्षा देण्यात आली आहे. तसेच फोनमध्ये ग्राफिक्ससाठी Adreno 619 GPU मिळतो. रियलमीचा हा स्मार्टफोन 8GB पर्यंत RAM आणि 128GB स्टोरेजसह सादर करण्यात आला आहे. ही स्टोरेज मायक्रो एसडी कार्डनं वाढवता येते.  

Realme 9 Pro स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या सेटअपमध्ये 64MP मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आहे. सोबत 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2 मेगेपिक्सलची कॅमेरा लेन्स देण्यात आली आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी यात 16MP चा फ्रंट कॅमेरा मिळतो. या रियलमी फोनमध्ये 5000mAh ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. रियलमीचा हा फोन 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो. 

Realme 9 Pro ची किंमत 

  • Realme 9 Pro 6GB/128GB:  17999 रुपये  
  • Realme 9 Pro 8GB/128GB: 20,999 रुपये  

हे दोन्ही व्हेरिएंट रियलमीच्या वेबसाईट आणि फ्लिपकार्टवरून 23 फेब्रुवारीपासून विकत घेता येतील.  

हे देखील वाचा:

Web Title: Realme 9 pro launched know price in india and specs 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.