गेल्या आठवड्यात आलेल्या दमदार 5G Smartphone वर 3 हजारांची सूट; फोनमध्ये 50MP कॅमेरा आणि 60W फास्ट चार्जिंग
By सिद्धेश जाधव | Published: February 21, 2022 11:46 AM2022-02-21T11:46:01+5:302022-02-21T11:46:11+5:30
Realme 9 Pro Plus 5G Specifications: Realme 9 Pro Plus 5G स्मार्टफोन भारतात 90Hz रिफ्रेश रेट, 50MP कॅमेरा, आणि 60W फास्ट चार्जिंगसह लाँच झाला आहे.
Realme 9 Pro+ 5G स्मार्टफोन गेल्या आठवड्यात भारतीयांच्या भेटीला आला आहे. आज या दमदार स्मार्टफोनचा पहिला सेल आहे. तुम्ही हा स्मार्टफोन दुपारी 12 वाजल्यापासून ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवरून विकत घेऊ शकता. कंपनी प्रीपेड ऑर्डर्सवर खास डिस्काउंट देत आहे. तसेच बँक ऑफर्सचा वापर करून देखील तुम्ही हा फोन स्वस्तात विकत घेऊ शकता.
Realme 9 Pro Plus ची किंमत आणि ऑफर्स
Realme 9 Pro Plus स्मार्टफोन दोन व्हेरिएंटमध्ये सादर करण्यात आला आहे. याच्या 6 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज मॉडेलची किंमत 24,999 रुपये आहे. तर 8 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज मॉडेलची किंमत 26,999 रुपये आहे. हा फोन Midnight Black, Aurora Green आणि Sunrise Blue कलरमध्ये विकत घेता येईल.
फोनच्या खरेदीच्या वेळी एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट किंवा डेबिट कार्डचा वापर केल्यास तुम्हाला 2 हजार रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट मिळेल. तर फ्लिपकार्टवर डेबिट किंवा क्रेडिट कार्डनं पेमेंट केल्यास 1 हजार रुपयांचा अतिरिक्त डिस्काउंट देखील मिळणार आहे. तसेच फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक क्रेडिट कार्डवर 5 टक्के अनलिमिटेड कॅशबॅक देखील दिला जात आहे.
Realme 9 Pro Plus चे स्पेसिफिकेशन्स
रियलमी 9 प्रो प्लस स्मार्टफोन 6.4 इंचाच्या फुलएचडी+ अॅमोलेड डिस्प्लेसह बाजारात आला आहे. जो 90हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 180हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. सिक्योरिटीसाठी यात इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला देखील सपोर्ट करतो. सोबत बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्स कंपनीनं दिले आहेत.
हा डिवाइस अँड्रॉइड 12 बेस्ड रियलमी युआय वर चालतो. प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये 2.5गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या ऑक्टाकोर प्रोसेसरसह MediaTek Dimensity 920 चिपसेट देण्यात आला आहे. तसेच ग्राफिक्ससाठी माली-जी68 एमसी4 जीपीयू मिळतो. सोबत 8GB पर्यंत रॅम आणि 128GB स्टोरेज देण्यात आली आहे.
फोटोग्राफीसाठी रियलमी 9 प्रो+ स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात एलईडी फ्लॅश, 50 मेगापिक्सलचा प्रायमरी Sony IMX766 सेन्सर, 8 मेगापिक्सलची वाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आहे. या स्मार्टफोनमध्ये 16 मेगापिक्सलचा Sony IMX471 सेन्सर फ्रंटला देण्यात आला आहे.पावर बॅकअपसाठी रियलमी 9 प्रो+ मध्ये 4,500एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे जी 60W SuperDart चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करते.
हे देखील वाचा:
- 18GB RAM सह आले दोन पावरफुल स्मार्टफोन; सोबत 135W ची सर्वात वेगवान फास्ट चार्जिंग
- 500 नव्हे तर फक्त 45 दिवसांमध्ये जाता येणार मंगळ ग्रहावर; संशोधकांनी शोधली भन्नाट आयडिया