8GB रॅम असलेला फाडू Realme स्मार्टफोन येतोय; 50W फास्ट चार्जिंगनं काही मिनिटांत रेडी होईल मोबाईल
By सिद्धेश जाधव | Published: January 21, 2022 12:50 PM2022-01-21T12:50:34+5:302022-01-21T12:50:46+5:30
Realme 9 Pro Plus 5G: Realme 9 Pro Plus 5G लवकरच 8GB RAM, 4500mAh बॅटरी आणि 50W फास्ट चार्जिंगसह सादर केला जाईल.
Realme नं काही दिवसांपूर्वी भारतात Realme 9i स्मार्टफोन लाँच करून नव्या सीरिजची सुरुवात केली आहे. Realme 9 सीरिजमध्ये फक्त एक स्मार्टफोन येणार नाही तर येत्या फेब्रुवारीमध्ये आणखीन दोन मॉडेल या सीरिजमध्ये येतील. काही दिवसांपूर्वी Realme 9 Pro ची माहिती आली होती. तर आता सीरिजमधील Realme 9 Pro+ स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स आणि रेंडर लीक झाले आहेत.
Realme 9 Pro+ ची लीक डिजाईन आणि स्पेक्स
MySmartPrix आणि टिपस्टर OnLeaks ने मिळून दिलेल्या माहितीनुसार, Realme 9 Pro+ या सीरीजमधील सर्वात प्रीमिमय स्मार्टफोन असेल. या फोनमध्ये 6.43-इंचाचा फुल एचडी+ अॅमोलेड डिस्प्ले मिळेल, जो 90Hz रिफ्रेश रेटसह बाजारात येईल. हा एक फ्लॅट डिस्प्ले आहे आणि खूप स्लिम बेझलसह सादर केला जाईल. आणि यात पंचहोल कटआऊट मिळू शकतो.
रियलमीचा हा स्मार्टफोन Android 12 आधारित ColorOS 12 वर चालेल. हा फोन MediaTek Dimensity 920 SoC सह बाजारात येईल. सोबत 8GB पर्यंत रॅम आणि 256GB इंटरनल स्टोरेज मिळू शकतो शकते. पॉवर बॅकअपची जबाबदारी 4500mAh च्या बॅटरीवर असेल. या स्मार्टफोनमध्ये 50W फास्ट चार्जिंग दिली जाऊ शकते.
हा फोन ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह सादर केला जाईल. ज्यात 50MP चा प्रायमरी कॅमेरा दिला जाऊ शकतो. सोबत 8MP अल्ट्रावाईड लेन्स आणि 2MP मॅक्रो कॅमेरा सेन्सर दिला जाऊ शकतो. रियलमीच्या या फोनमध्ये 16MP चा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो. या मोबाईलचे ब्लॅक, अरोरा ग्रीन आणि सनराईज ब्लू कलर व्हेरिएंट बाजारात येऊ शकतात.
हे देखील वाचा:
खुशखबर! स्वस्त होणार आहेत 4G Smartphone; 10,000 रुपयांपर्यंतची होऊ शकते कपात
दिवसभर डेटा पुरत नाही? मग या स्मार्टफोन ट्रिक्स मिळवून देतील तुमचा वाया जाणारा मोबाईल डेटा