8GB RAM सह स्वस्त Realme 9i येणार ग्राहकांच्या भेटीला; डिजाइन देखील झाली लीक
By सिद्धेश जाधव | Published: December 6, 2021 12:40 PM2021-12-06T12:40:06+5:302021-12-06T12:41:04+5:30
Realme 9i Launch: लवकरच Realme 9 Series ग्राहकांच्या भेटीला येईल. यातील Realme 9i स्मार्टफोन 8GB RAM, 64MP Camera, 5000mAh बॅटरी आणि 90hz रिफ्रेश रेटसह सादर केला जाऊ शकतो.
Realme आपल्या Realme 9 Series वर काम करत आहे. या सीरिजमध्ये 4 फोन सादर केले जाऊ शकतात. ही सीरिज पुढील वर्षी Realme 9, Realme 9 Pro, Realme 9 Pro+ आणि Realme 9i या मॉडेलसह बाजारात येईल. आता या सीरिजमधील Realme 9i चे रेंडर समोर आले आहेत, ज्यातून फोनच्या डिजाईनची माहिती मिळाली आहे. तसेच मीडिया रिपोर्टमधून काही महत्वाचे स्पेक्स देखील समजले आहेत.
Realme 9i ची डिजाईन
Realme 9i स्मार्टफोन पंच होल डिजाईनसह सादर केला जाईल, असं रेंडर्समधून दिसतं आहे. सोबत कर्व्ड डिस्प्ले आणि स्लिम बेजल मिळतील. फोनच्या वरच्या बेजलमध्ये मायक्रोफोन आणि स्पिकर ग्रिल आहे. तर उजवीकडे पॉवर बटन आणि डावीकडे वॉल्यूम की देण्यात आली आहे. मागच्या बाजूस एलईडी फ्लॅशसह ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळेल.
Realme 9i चे संभाव्य स्पेसीफिकेशन्स
मीडिया रिपोर्टनुसार, Realme 9i स्मार्टफोनमधील मुख्य कॅमेरा 64MP चा सेन्सर असू शकतो. सोबत 8MP चा दुसरा सेन्सर आणि 2MP चा तिसरा सेन्सर मिळेल. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 32MP चा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो. या फोनमध्ये पॉवर बॅकअपसाठी 5000mAh ची बॅटरी मिळू शकते.
Realme 9i स्मार्टफोन MediaTek Helio G90T प्रोसेसरसह बाजारात येईल. त्याचबरोबर 8GB RAM आणि 128GB इंटरनल स्टोरेज देण्यात येईल. यापेक्षा जास्त व्हेरिएंट सादर होण्याची शक्यता देखील टाळता येत नाही. हा फोन Android 11 आधारित Realme UI वर चालेल. फोनमध्ये 6.5 इंचाचा FHD+ AMOLED डिस्प्ले मिळू शकतो, जो 90Hz रिफ्रेश रेट आणि इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर बाजारात येईल.