Realme 9i Launch: 11GB RAM असलेले दमदार स्मार्टफोन; स्नॅपड्रॅगन प्रोसेसर असूनही किंमत 14 हजारांपेक्षाही कमी  

By सिद्धेश जाधव | Published: January 18, 2022 03:35 PM2022-01-18T15:35:40+5:302022-01-18T15:35:59+5:30

Realme 9i Launch: Realme 9i स्मार्टफोन 1GB RAM, 50MP Camera, 5000mAh ची बॅटरी आणि 33W फास्ट चार्जिंगसह येत्या 22 जानेवारीला विकत घेता येईल.

realme 9i launched in india with snapdragon 680 50mp triple cameras price specification sale  | Realme 9i Launch: 11GB RAM असलेले दमदार स्मार्टफोन; स्नॅपड्रॅगन प्रोसेसर असूनही किंमत 14 हजारांपेक्षाही कमी  

Realme 9i Launch: 11GB RAM असलेले दमदार स्मार्टफोन; स्नॅपड्रॅगन प्रोसेसर असूनही किंमत 14 हजारांपेक्षाही कमी  

googlenewsNext

Realme 9i अखेरीस भारतात लाँच झाला आहे. कंपनीनं एका ऑनलाइन इव्हेंटच्या माध्यमातून Realme 9-सीरीज पहिला स्मार्टफोन देशात आणला आहे. यात 11GB RAM, 50MP Camera, 5000mAh ची बॅटरी आणि 33W फास्ट चार्जिंग देण्यात आली आहे. चला जाणून घेऊया Realme 9i ची किंमत, स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स.  

Realme 9i ची किंमत 

Realme 9i चे दोन व्हेरिएंट भारतात आले आहेत. यातील 4GBरॅम आणि 64GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 13,999 रुपये ठेवण्यात आली आहे. तर 6GB रॅम आणि 128GB स्टोरेजसाठी 15,999 रुपये द्यावे लागतील. कंपनीनं याचे Blue आणि Black असे दोन कलर्स सादर केले आहेत. हा हँडसेट Flipkart आणि कंपनीच्या वेबसाईटवर 25 जानेवारीपासून खरेदीसाठी उपलब्ध होईल. परंतु त्याआधी 22 जानेवारीला याचा अर्ली सेल फ्लिपकार्ट आणि रियलमी इंडियाच्या वेबसाईटवरून होईल.  

Realme 9i चे स्पेसिफिकेशन्स   

रियलमी 9आय कंपनीनं 6.6 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेसह सादर केला आहे. हा पंच-होल असलेला आयपीएस एलसीडी पॅनल 90हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. हा मोबाईल अँड्रॉइड 11 बेस्ड रियलमी युआय 2.0 वर चालतो. याला प्रोसेसिंगसाठी क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगन 680 चिपसेटची पॉवर देण्यात आली आहे. सोबत 6 जीबी रॅम +5 जीबी वर्चुअल वचुर्अल रॅम असा एकूण 11जीबी रॅम देण्यात आला आहे. यात 128 जीबी इंटरनल स्टोरेज देखील आहे.   

रियलमी 9आय मागे ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. ज्यात एलईडी फ्लॅशसह 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे. तसेच 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा ब्लॅक अँड व्हाईट सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी यात 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. साईड माउंटेड फिंगरप्रिंटसह आलेला हा फोन 5000mAh च्या बॅटरीला सपोर्ट करतो, जी 33W फास्ट चार्जिंग स्पीडनं चार्ज करता येते.    

हे देखील वाचा:

30 हजारांच्या आत Windows 11 असलेला शानदार लॅपटॉप; 16GB RAM सह 10th जेनेरेशन Intel प्रोसेसर

Amazon Sale: फक्त 11,500 रुपयांमध्ये मिळतोय Redmi चा दमदार Smart TV; या कंपन्या देखील देतायत जबरा डिस्काउंट, पाहा यादी

Web Title: realme 9i launched in india with snapdragon 680 50mp triple cameras price specification sale 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.