64MP चा शानदार कॅमेरा आणि 5000mAh बॅटरीसह Realme 9i होऊ शकतो लाँच; जाणून घ्या वैशिष्ट्ये
By सिद्धेश जाधव | Published: November 29, 2021 05:53 PM2021-11-29T17:53:24+5:302021-11-29T17:53:40+5:30
मीडिया रिपोर्ट्समधून Realme 9i च्या स्पेसिफिकेशन्सची माहिती मिळाली आहे. हा फोन 64MP Camera, 8GB RAM, 5000mAh Battery आणि 32MP Selfie Camera सह सादर केला जाऊ शकतो.
Realme च्या बजेट फ्रेंडली Realme 9 सीरीजच्या लाँचची तयारी पूर्ण झाल्याचं दिसत आहे. ही सीरीज पुढील वर्षी येईल हे देखील कंपनीनं सांगितलं आहे. तसेच सीरिजमधील Realme 9, 9 Pro, 9 Pro Plus, आणि Realme 9i या चार स्मार्टफोन्सच्या नावांची माहिती मिळाली आहे. आता मीडिया रिपोर्ट्समधून Realme 9i च्या स्पेसिफिकेशन्सची माहिती मिळाली आहे.
Realme 9i चे लीक स्पेसिफिकेशन्स
Realme 9i स्मार्टफोनमध्ये 6.5-इंचाचा एचडी+ आयपीएस एलसीडी डिस्प्ले दिला जाऊ शकतो. या फोनला MediaTek Helio G90T SoC ची प्रोसेसिंग पॉवर मिळू शकते. त्याचबरोबर 8GB पर्यंतचा रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज मिळेल.
रियलमीच्या बॅक पॅनलवर क्वॉड रियर कॅमेरा सेटअप मिळेल. ज्यात 64MP चा प्रायमरी कॅमेरा असेल, त्याचबरोबर 8MP चा अल्ट्रा वाईड कॅमेरा आणि 2MP चा मॅक्रो आणि डेप्थ कॅमेरा सेन्सर मिळेल. हा फोन 32 मेगापिक्सलच्या शानदार फ्रंट कॅमेरा सेन्सरसह बाजारात येऊ शकतो. पॉवर बॅकअपसाठी या स्मार्टफोनमध्ये 5000mAh ची बॅटरी मिळेल.
Realme 9i सीरिजमधील सर्वात स्वस्त स्मार्टफोन असेल. हा फोन जानेवारी 2022 मध्ये लाँच केला जाऊ शकतो. हा फोन Realme 9 आणि 9 Pro नंतर बाजरात उतरू शकतो, असे टिपस्टर Chun ने सांगितलं आहे. The Pixel मात्र जानेवारीच्या लाँचला दुजोरा दिला आहे. त्यामुळे जोपर्यंत कंपनी Realme 9i ची लाँच डेट सांगत नाही तोपर्यंत यावर विश्वास ठेवता येणार नाही.