12 दिवसांच्या बॅटरी बॅकअपसह Realme Band 2 लाँच; हार्ट रेट मॉनिटर, SpO2 सेन्सरसह येणार बाजारात 

By सिद्धेश जाधव | Published: September 16, 2021 12:33 PM2021-09-16T12:33:12+5:302021-09-16T12:36:29+5:30

Realme Band 2 India Launch: कंपनीने Realme Band 2 सादर केले आहेत. सध्या मलेशियात दाखल झालेला हा फिटनेस ट्रॅकर पुढील महिन्यात भारतात सादर केला जाऊ शकतो.  

Realme band 2 launched features larger colour display spo2 sensor and more price specifications  | 12 दिवसांच्या बॅटरी बॅकअपसह Realme Band 2 लाँच; हार्ट रेट मॉनिटर, SpO2 सेन्सरसह येणार बाजारात 

12 दिवसांच्या बॅटरी बॅकअपसह Realme Band 2 लाँच; हार्ट रेट मॉनिटर, SpO2 सेन्सरसह येणार बाजारात 

Next
ठळक मुद्देRealme Band 2 तुम्ही खेळत असलेले खेळ आणि व्यायाम ओळखतो. Realme Band 2 मधील GH3011 सेन्सर हार्ट-रेट मॉनिटरिंगचे काम करतो.

रियलमीने आपला नवीन फिटनेस ट्रॅकर Realme Band 2 लाँच केला आहे. हा डिवाइस मलेशियात सादर करण्यात आला आहे. तिथे या ट्रॅकरची किंमत 139 MYR ठेवण्यात आली आहे. ही किंमत 2,500 रुपयांमध्ये रूपांतरित होते. टिप्सटर योगेश बरारने दिलेल्या माहितीनुसार Realme Band 2 पुढील महिन्यात म्हणजे ऑक्टोबरमध्ये भारतात सादर केला जाईल.  

Realme Band 2 चे स्पेसिफिकेशन्स  

Realme Band 2 मध्ये एक 1.4-इंचाची टच स्क्रीन देण्यात आली आहे. हा डिस्प्ले 167×320 पिक्सल रिजोल्यूशन आणि 500 निट्स पीक ब्राईटनेसला सपोर्ट करतो. जुन्या रियलमी बँडच्या तुलनेत हा मोठा डिस्प्ले आहे. यात 50 पेक्षा जास्त डायल फेस मिळतात. त्यामुळे तुम्ही तुमच्या मूडनुसार ट्रॅकरचा लूक बदलू शकता. तसेच तुम्ही तुमच्या आवडीचा फोटो देखील डायल फेस म्हणून वापरू शकता. हा नवीन फिटनेस ट्रॅकर युनिव्हर्सल 18mm इंटरचेंजेबल रिस्ट स्ट्रॅपला सपोर्ट करतो. म्हणजे तुमच्याकडे आधीपेक्षा जास्त स्ट्रॅप ऑप्शन उपलब्ध होतील.  

Realme Band 2 मधील GH3011 सेन्सर हार्ट-रेट मॉनिटरिंगचे काम करतो. त्यामुळे तुमच्या हृदयाच्या स्पंदनात काही धोकादायक बदल झाल्यास तुम्हाला त्याची माहिती मिळते. तसेच या डिवाइसमध्ये रक्तातील ऑक्सीजनचा स्तर मोजण्यासाठी SpO2 सेन्सर देण्यात आला आहे.अँड्रॉइड आणि आयफोनशी कनेक्ट होणारा हा फिटनेस ट्रॅकर स्लीप मॉनिटरिंगचे काम देखील करतो.  

Realme Band 2 तुम्ही खेळत असलेले खेळ आणि व्यायाम ओळखतो. यात क्रिकेट, हायकिंग, रनिंग आणि योग इत्यादी मोड्स आहेत. येत्या काही दिवसांत यात आणखीन 90 स्पोर्ट्स मोड जोडण्यात येतील. Realme Band 2 50 मीटरपर्यंत वॉटर रेजिस्टन्ससह येतो. यात कनेक्टिव्हिटीसाठी Bluetooth v5.1 देण्यात आली आहे. Realme Band 2 मधील 204mAh ची बॅटरी 12 दिवसांचा बॅकअप देऊ शकतो, असा दावा कंपनीने केला आहे.  

Web Title: Realme band 2 launched features larger colour display spo2 sensor and more price specifications 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :realmeरियलमी