पुढल्या आठवड्यात येणार रियलमीचा पहिला लॅपटॉप; Realme Book सोबत टॅबलेट देखील होणार लाँच 

By सिद्धेश जाधव | Published: August 11, 2021 03:42 PM2021-08-11T15:42:05+5:302021-08-11T15:42:31+5:30

Realme Book Launch Date: कंपनीचा आगामी लॅपटॉप Realme Book चीनमध्ये 18 ऑगस्टला सादर केला जाईल. Realme Book लॅपटॉप चीनमध्ये Realme 828 Fan Festival इव्हेंट दरम्यान सादर केला जाईल.

Realme book launch date official announcement  | पुढल्या आठवड्यात येणार रियलमीचा पहिला लॅपटॉप; Realme Book सोबत टॅबलेट देखील होणार लाँच 

पुढल्या आठवड्यात येणार रियलमीचा पहिला लॅपटॉप; Realme Book सोबत टॅबलेट देखील होणार लाँच 

Next
ठळक मुद्देRealme Book लॅपटॉप चीनमध्ये Realme 828 Fan Festival इव्हेंट दरम्यान सादर केला जाईल.

ओप्पोचा सब-ब्रँड म्हणून बाजारात आलेला Realme ब्रँड आता अश्या सेगमेंटमध्ये पाऊल टाकत आहे जिथे पॅरेन्ट कंपनीने देखील प्रवेश केला नाही. रियलमी स्मार्टफोन, स्मार्टवॉट, वीयरेबल, स्मार्ट टीव्ही, स्मार्ट गॅजेट्स नंतर आता आपला पहिला लॅपटॉप लाँच करणार आहे. शाओमी प्रमाणे आता रियलमीचेलॅपटॉप बाजारात दाखल होतील. कंपनीने चिनी सोशल मीडिया साईट Weibo वर घोषणा केली आहे. या घोषणेनुसार कंपनीचा आगामी लॅपटॉप Realme Book चीनमध्ये 18 ऑगस्टला सादर केला जाईल. 

Realme Book लाँच डेट  

Realme Book लॅपटॉप चीनमध्ये Realme 828 Fan Festival इव्हेंट दरम्यान सादर केला जाईल. या लॅपटॉपसोबत कंपनी एक टॅबलेट देखील लाँच करू शकते, जो Realme Pad नावाने बाजारात येईल. Realme Pad टॅबलेट कंपनीच्या लॅपटॉप रियलमी बुकसोबतच 18 ऑगस्टला सादर होईल कि नाही हे अजून स्पष्ट झाले नाही.  

Realme Book चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स 

रियलमीच्या आगामी लॅपटॉपमध्ये Intel 11th gen Core i5-1135G7 प्रोसेसर दिला जाऊ शकतो. तसेच या लॅपटॉपमध्ये कंपनी 14-इंचाचा 2K डिस्प्ले देऊ शकते. रियलमीबुकमध्ये 16GB पर्यंतचा DDR4 RAM, 512GB स्टोरेज, Intel Xe ग्राफिक्स आणि 54Wh बॅटरी 65W फास्ट चार्जिंगसह मिळू शकते. हा Windows 10 Home ऑपरेटिंग सिस्टमवर चालेल.  

Realme Book ची भारतीय किंमत    

या लॅपटॉपची भारतीय किंमत 40,000 रुपयांपासून सुरु होऊ शकते, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. रियलमीने याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही, त्यामुळे ठोस माहितीसाठी रियलमी बुकच्या लाँचची वाट बघावी लागले.    

Web Title: Realme book launch date official announcement 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.