रियलमी लॅपटॉप्सची किंमत, स्पेसिफिकेशन आणि रेंडर्स लीक; लवकरच येऊ शकतात बाजारात 

By सिद्धेश जाधव | Published: July 14, 2021 12:35 PM2021-07-14T12:35:02+5:302021-07-14T12:35:37+5:30

Realme Book लॅपटॉप 11th जनरेशन इंटेल कोर आय3 आणि कोर आय5 प्रोसेसरसह अनेक रॅम आणि स्टोरेज व्हेरिएंटसह बाजारात दाखल होऊ शकतात.  

Realme book may comes with 14 inch full hd display price under rs 40000 renders leak online  | रियलमी लॅपटॉप्सची किंमत, स्पेसिफिकेशन आणि रेंडर्स लीक; लवकरच येऊ शकतात बाजारात 

रियलमी लॅपटॉप्सची किंमत, स्पेसिफिकेशन आणि रेंडर्स लीक; लवकरच येऊ शकतात बाजारात 

Next

स्मार्टफोन निर्माता चिनी कंपनी रियलमी लवकरच लॅपटॉप सेगमेंटमध्ये पदार्पण करणार आहे. कंपनी Realme Book सीरिजअंतर्गत आपले लॅपटॉप लाँच करणार आहे. या लॅपटॉप्सचे रेंडर्स आता ऑनलाइन लीक झाले आहेत. तसेच लीकमधून रियलमी बुकच्या स्पेसिफिकेशन्स आणि किंमतीची माहिती देखील मिळाली आहे.  

Realme Book ची भारतीय किंमत  

Realme Book चे रेंडर्स आणि 360 डिग्री व्हिडीओ GizNext आणि OnLeaks यांनी मिळून प्रकाशित केले आहेत. रेंडर्समध्ये हे लॅपटॉप सिल्वर फिनिशसह दाखवण्यात आले आहेत. या लॅपटॉपमध्ये आईसलँड-स्टाइल ब्लॅक कीबोर्ड देण्यात आला आहे. तसेच, लॅपटॉपमध्ये पावर बटण कीबोर्डच्या वरच्या बाजूला उजव्या कोपऱ्यात आहे.  

समोर आलेल्या रिपोर्ट्सनुसार हे हा रियलमी लॅपटॉप भारतात ऑगस्टपर्यंत लाँच केला जाऊ शकतो. तसेच या लॅपटॉपची किंमत 40,000 रुपयांपासून सुरु होऊ शकते, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. रियलमीने याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही, त्यामुळे ठोस माहितीसाठी रियलमी बुकच्या लाँचची वाट बघावी लागले.  

Realme Books चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स 

Realme Book मध्ये 14 इंचाचा फुल-एचडी एलईडी अँटी-ग्लेयर डिस्प्ले दिला जाऊ शकतो. हा लॅपटॉप स्लिम बेजल्ससह सादर केला जाऊ शकतो. लॅपटॉपचे वजन 1.5 किलोग्राम असेल. या रियलमी लॅपटॉपमध्ये 11th जनरेशन इंटेल कोर आय3 आणि कोर आय5 प्रोसेसर असू शकतात, सोबत अनेक रॅम आणि स्टोरेज व्हेरिएंट उपलब्ध होऊ शकतात. रियलमी बुकमध्ये Windows 10 ऑपरेटिंग सिस्टम प्री-इंस्टॉल असू हुकते. पोर्ट्समध्ये यूएसबी टाइप-सी, यूएसबी टाइप-ए आणि मायक्रो-हेडफोन कॉम्बो जॅक देखील मिळू शकतो.  

Web Title: Realme book may comes with 14 inch full hd display price under rs 40000 renders leak online 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.