किफायतशीर प्रॉडक्ट्सचा पाऊस; Realme Buds Wireless 2, Buds Wireless 2 Neo आणि Buds Q2 Neo भारतात लाँच 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2021 06:37 PM2021-07-23T18:37:30+5:302021-07-23T18:38:49+5:30

Realme Audio Products Lineup Launch: Realme Buds Wireless 2, Realme Buds Wireless 2 Neo, आणि Realme Buds Q2 Neo हे ऑडिओ प्रोडक्टस बाजारात आणले आहेत.

Realme buds wireless 2 buds wireless 2 neo and buds q2 neo launched in india  | किफायतशीर प्रॉडक्ट्सचा पाऊस; Realme Buds Wireless 2, Buds Wireless 2 Neo आणि Buds Q2 Neo भारतात लाँच 

किफायतशीर प्रॉडक्ट्सचा पाऊस; Realme Buds Wireless 2, Buds Wireless 2 Neo आणि Buds Q2 Neo भारतात लाँच 

Next

Realme ने भारतात लाइफस्टाइल कॅटेगरीमध्ये 5 नवीन वीयरेबल प्रॉडक्ट्स सादर केले आहेत. यात Realme Watch 2 आणि Realme Watch 2 Pro दोन स्मार्टवॉचचा समावेश आहे. त्याचबरोबर कंपनीने Realme Buds Wireless 2, Realme Buds Wireless 2 Neo, आणि Realme Buds Q2 Neo हे ऑडिओ प्रोडक्टस देखील बाजारात आणले आहेत. या लेखात आपण रियलमीच्या ऑडिओ प्रॉडक्ट्सच्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्सची माहिती घेणार आहोत.  

Realme ऑडिओ प्रॉडक्ट्सची किंमत 

Realme Buds Wireless 2 लाँच ऑफरअंतगर्त 1,999 रुपयांमध्ये फ्लिपकार्टवरून 26 जुलैपासून विकत घेता येतील. लाँच ऑफरनंतर यांची किंमत 2,299 रुपये होईल.  

Realme Buds Wireless 2 Neo लाँच ऑफरअंतगर्त 1,399 रुपयांमध्ये अ‍ॅमेझॉनवरून 26 जुलैपासून विकत घेता येतील. लाँच ऑफरनंतर हे इयरबड्स 1,499 रुपयांमध्ये खरेदीसाठी उपलब्ध होतील.  

Realme Buds Q2 Neo ची लाँचऑफरअंतगर्त किंमत 1,299 रुपये आहे. 29 जुलै पासून हे इयरफोन्स फ्लिपकार्टवरून विकत घेता येतील. लाँचऑफर नंतर यांची किंमत 300 रुपयांनी वाढवली जाईल.  

Realme Buds Wireless 2  

Realme Buds Wireless 2 कंपनीने सदर केलेले नेकबँड स्टायल इयरफोन आहेत. यात अ‍ॅक्टिव्ह नॉइज कॅन्सलेशन फिचर देण्यात आले आहे. तसेच हे इयरफोन कॉलिंगसाठी AI नॉइज कॅन्सलेशनला सपोर्ट करतात. या इयरफोनमध्ये 13.6mm बेस बूस्ट ड्रायव्हर मिळतो. तसेच यात Bass Boost+ फिचर देखील देण्यात आले आहे. हे इयरबड्स Dart Charge टेक्नॉलॉजीमुळे फक्त 10 मिनिटांच्या चार्जमध्ये 12 तासांचा बॅकअप देतात. फुल चार्ज केल्यास इयरबड्स 22 तासांचा प्लेबॅक टाइम देऊ शकतात. हे इयरबड्स IPX5 वॉटर रेजिस्टन्ससह सदर करण्यात आले आहेत.  

Realme Buds Wireless Neo 

Realme Buds Wireless 2 Neo इयरबड्स कंपनीच्या Buds Wireless 2 पेक्षा स्वस्त आहेत. हे फुल चार्ज केल्यावर 17 तासांचा बॅकअप देतात. यात एनवायरमेन्ट नॉइज कॅन्सलेशन टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे. या इयरबड्समध्ये कंपनीने 11.2mm ड्रायव्हर बेस बूस्ट+ टेक्नॉलॉजीसह दिला आहे. रियलमी बड्स वायरलेस 2 नियो IPX4 वॉटर रेजिस्टन्स बाजारात आले आहेत.  

Realme Buds Q2 Neo  

Realme Buds Q2 Neo कंपनीचे स्वस्त ट्रू वायरलेस स्टीरियो (TWS) इयरबड्स आहेत. हे बड्स सिंगल चार्जमध्ये 20 तासांचा बॅकअप देतात. Realme Buds Q2 Neo मध्ये 10mm चा डायनॅमिक बेस बूस्ट ड्रायव्हर देण्यात आला आहे. यात एनवायरमेंट नॉइज कॅन्सलेशन (ENC) टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे. हे इयरबड्स इंटेलिजेंट टच कंट्रोलच्या माध्यमातून नियंत्रित करता येतात. तसेच यात कंपनीने IPX4 वॉटर रेजिस्टन्स दिला आहे.  

Web Title: Realme buds wireless 2 buds wireless 2 neo and buds q2 neo launched in india 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.