कोणताही गाजावाजा न करता भारतात Realme C11 (2021) लाँच; बघा या स्वस्त स्मार्टफोनची वैशिष्ट्ये
By सिद्धेश जाधव | Published: June 25, 2021 07:40 PM2021-06-25T19:40:39+5:302021-06-25T19:42:14+5:30
Realme C11 (2021) price: कंपनीने Realme C11 (2021) भारतात लाँच केला आहे. या फोनमध्ये 5000mAh बॅटरी आणि 6.5 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे.
ओप्पोचा सबब्रँड म्हणून Realme ने भारतात पदार्पण केले होते. आता स्वतंत्र ब्रँड म्हणून पण कंपनीने खूप चाहते मिळवले आहेत. कालच कंपनीने Realme Narzo 30 सिरीजमध्ये दोन स्मार्टफोन्स लाँच केले होते. कंपनीने या सीरिजमध्ये Narzo 30 4G आणि Narzo 30 5G असे दोन स्मार्टफोन्स लाँच केले होते. यासाठी कंपनीने एका ऑनलाईन इव्हेंटचे आयोजन केले होते. परंतु आज कंपनीने कोणताही सोहळा न करता चुपचाप आपला एक नवीन लो बजेट स्मार्टफोन लाँच केला आहे. कंपनीने Realme C11 (2021) भारतात लाँच केला आहे. या फोनमध्ये 5000mAh बॅटरी आणि 6.5 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे.
Realme C11 (2021) ची किंमत
Realme C11 (2021) भारतात 2GB रॅम आणि 32GB स्टोरेज अशा एकाच व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. या स्मार्टफोनची किंमत 6,999 रुपये ठेवण्यात आली आहे. हा स्मार्टफोन Cool Blue आणि Cool Grey अशा दोन रंगात विकत घेता येईल. इंट्रोडक्टरी ऑफर अंतर्गत कंपनी 200 रुपयांचा डिस्काउंट देत आहे, त्यामुळे या फोनची किंमत 6,799 रुपये होते.
Realme C11 (2021) चे स्पेसिफिकेशन्स
Realme C11 (2021) मध्ये 6.5 इंचाचा एचडी+ ड्रॉप नॉच डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेचे रिजोल्यूशन 1600x720 पिक्सल इतके आहे. या स्मार्टफोनमधील ऑक्टकोर प्रोसेसरचे नाव मात्र कंपनीने सांगितले नाही. 2GB रॅम आणि 32GB स्टोरेजसह येणार स्मार्टफोनमध्ये अँड्रॉइड 11 आधारित रियलमी यूआय गो एडिशन देण्यात आले आहे. या फोनची स्टोरेज मायक्रो एसडी कार्डने वाढवता येईल.
फोटोग्राफीसाठी Realme C11 (2021) मध्ये 8 मेगापिक्सलचा एक रियर कॅमेरा देण्यात आला आहे. हा कॅमेरा 4x डिजिटल झूमला सपोर्ट करतो. सेल्फी आणि व्हिडियो कॉलिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. Realme C11 (2021) मध्ये पावर बॅकअपसाठी 5000mAh ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. या बॅटरीच्या मदतीने इतर फोन्स देखील चार्ज करता येतात कारण यात रिवर्स चार्जिंगची सुविधा देण्यात आली आहे.