लाँचनंतर महिनाभरात Realme C25s महागला; जाणून घ्या नवीन किंमत
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2021 05:17 PM2021-06-23T17:17:54+5:302021-06-23T17:19:17+5:30
Realme C25s new price: Realme C25s ची नवीन किंमत Flipkart आणि Realme वेबसाइटवर लिस्ट करण्यात आली आहे.
Realme ने भारतात 8 जून रोजी Realme C25s हा स्मार्टफोन लाँच केला होता. लाँचच्या वेळी या स्मार्टफोनच्या 4 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेजची किंमत 9,999 रुपये होती. मीडियाटेक हीलियो जी85 प्रोसेसर असलेल्या या फोनमध्ये कंपनीने 6,000 एमएएचची बॅटरी आणि ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे.
Realme C25s ची नवीन किंमत
Realme.com वरील लिस्टिंगनुसार, Realme C25s च्या 4 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 500 रुपयांनी वाढवून आता 10,999 रुपये करण्यात आली आहे. तसेच या फोनचा 10,999 रुपयांना मिळणारा 4 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंट आता 11,499 रुपयांना मिळत आहे. या भाववाढीची माहिती 91mobiles ने सर्वप्रथम दिली आहे.
Realme C25s ची डिजाईन
Realme C25s वॉटरड्रॉप नॉच डिजाइनसह सादर केला गेला आहे. तसेच, फोनच्या मागे Geometric Art Design दिली आहे. मागील पॅनलवर वरच्या बाजूला डावीकडे चौरसाकृती कॅमेरा सेटअप आणि फिंगरप्रिंट सेन्सर आहे. उजव्या पॅनलवर वॉल्यूम रॉकर व पावर बटण तर डाव्या पॅनलवर सिम स्लॉट आहे. फोनच्या खालच्या पॅनलवर 3.5एमएम जॅकसह यूएसबी टाइप सी पोर्ट आणि स्पीकर ग्रिल आहे.
Realme C25s चे फीचर्स व स्पेसिफिकेशन्स
रियलमी सी25एस मध्ये 6.5 इंचाचा एचडी+ एलसीडी डिस्प्ले आहे. फोनमध्ये मीडियाटेक हीलियो G85 प्रोसेसर देण्यात आला आहे. तसेच, फोन 4 जीबी रॅमसह 64जीबी स्टोरेज आणि 4जीबी रॅम 128 जीबी स्टोरेजसह लाँच झाला आहे.
रियलमी सी25एस मध्ये फोटोग्राफीसाठी मागील बाजूस क्वाड-कॅमेरा देण्यात आला आहे. यात 48 मेगापिक्सल प्राइमरी, 2 मेगापिक्सल मॅक्रो आणि 2 मेगापिक्सलचा ब्लॅक-अँड-वाइट कॅमेरा आहे. फोनमध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. फोनला पावर देण्यासाठी 6,000mAh बॅटरी देण्यात आली आहे. स्मार्टफोन अँड्रॉइड 11 आधारित रियलमी UI 2.0 स्किनसह येतो.