फक्त 7000 रुपयांमध्ये येतोय Realme चा नवीन स्मार्टफोन, मोठ्या डिस्प्लेसह मिळणार दमदार बॅटरी 

By सिद्धेश जाधव | Published: May 30, 2022 01:03 PM2022-05-30T13:03:20+5:302022-05-30T13:03:30+5:30

Realme C30 स्मार्टफोन लवकरच एंट्री लेव्हल स्मार्टफोनमध्ये सादर केला जाऊ शकतो.  

Realme C30 May Come Under 7000 Rupees In India  | फक्त 7000 रुपयांमध्ये येतोय Realme चा नवीन स्मार्टफोन, मोठ्या डिस्प्लेसह मिळणार दमदार बॅटरी 

फक्त 7000 रुपयांमध्ये येतोय Realme चा नवीन स्मार्टफोन, मोठ्या डिस्प्लेसह मिळणार दमदार बॅटरी 

googlenewsNext

Realme नं काही दिवसांपूर्वी भारतात आपल्या फ्लॅगशिप स्मार्टफोनची संख्या वाढवली होती. कंपनीनं जीटी सीरिजमध्ये काही स्मार्टफोन्सची भर टाकली आहे. आता कंपनी भारतात आपला बजेट स्मार्टफोनचा पोर्टफोलियो Realme C30 लाँच करून वाढवू शकते. मीडिया रिपोर्ट्सनुसार पुढील महिन्यात हा नवीन रियलमी स्मार्टफोन भारतीयांच्या भेटीला येऊ शकतो. टिपस्टर मुकुल शर्मा आणि पारस गुगलानी यांनी Realme C30 स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स देखील लीक केले आहेत.  

संभाव्य स्पेसिफिकेशन्स 

लिक्सनुसार, आगामी Realme C30 स्मार्टफोन Unisoc चिपसेटसह सादर केला जाऊ शकतो. या फोनचे भारतात 2GB RAM व 32GB स्टोरेज आणि 3GB RAM व 32GB स्टोरेज असलेले दोन व्हेरिएंट येऊ शकतात. फोनमध्ये 13MP चा रियर कॅमेरा आणि 5MP चा सेल्फी कॅमेरा मिळू शकतो. या फोनमध्ये 6.58-इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले मिळू शकतो.  

रियलमीचा डेनिम ब्लॅक, लेक ब्लू आणि बँबो ग्रीन कलरमध्ये सादर केला जाऊ शकतो. यात 5,000mAh ची बॅटरी मिळेल जी 10W चार्जिंगला सपोर्ट करू शकते. या फोनची जाडी 8.48mm आणि वजन 181 ग्राम असेल. रियलमीचा हा स्मार्टफोन भारतात 7,000 रुपयांची किंमतीत लाँच केला जाऊ शकतो. 

जुन्या Realme C31 चे स्पेसिफिकेशन्स  

रियलमी सी31 मध्ये 6.5 इंचाचा एचडी+ एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन अँड्रॉइड 11 आधारित रियलमी युआय आर एडिशनवर चालतो. कंपनीनं यात ऑक्टकोर UniSoC T612 प्रोसेसरचा वापर केला आहे. सोबत 4GB पर्यंत रॅम आणि 64GB पर्यांतची इंटरनल स्टोरेज मिळते. बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्ससह यात साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे.  

फोटोग्राफीसाठी रियलमी सी31 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. ज्यात एलईडी फ्लॅशसह 13 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आणि 2 मेगापिक्सलची ब्लॅक अँड व्हाईट लेन्स आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. तसेच पावर बॅकअपसाठी रियलमी सी31 स्मार्टफोनमध्ये 10वॉट फास्ट चार्जिगसह 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. 

Web Title: Realme C30 May Come Under 7000 Rupees In India 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.