Realme च्या सुंदर स्मार्टफोनचा पहिला सेल; फक्त 7,500 रुपयांमध्ये 5000mAh ची बॅटरी 

By सिद्धेश जाधव | Published: June 27, 2022 10:54 AM2022-06-27T10:54:56+5:302022-06-27T10:55:02+5:30

Realme C30 स्मार्टफोनच्या 2GB रॅम व 32GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 7,499 रुपये आहे.

Realme c30 sale today in india on flipkart know price and specifications  | Realme च्या सुंदर स्मार्टफोनचा पहिला सेल; फक्त 7,500 रुपयांमध्ये 5000mAh ची बॅटरी 

Realme च्या सुंदर स्मार्टफोनचा पहिला सेल; फक्त 7,500 रुपयांमध्ये 5000mAh ची बॅटरी 

Next

Realme नं भारतात गेल्या आठवड्यात आपला एंट्री लेव्हल स्मार्टफोन Realme C30 लाँच केला होता. या हँडसेटची किंमत सर्वात कमी आहे. Realme C30 स्मार्टफोन Unisoc T612 प्रोसेसर, 5000mAh ची बॅटरी आणि 8MP रियर कॅमेऱ्यासह बाजारात आला आहे. आज या हँडसेटचा पहिला सेल आहे.  

Realme C30 ची किंमत 

Realme C30 स्मार्टफोनच्या 2GB रॅम व 32GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 7,499 रुपये आहे. तर 3GB रॅम व 32GB मेमरी असलेला मॉडेल 8,299 रुपयांमध्ये विकत घेता येईल. फोन लेक ब्लू, बांबू ग्रीन आणि डेनिम ब्लॅक कलरमध्ये सादर करण्यात आला आहे. या हँडसेटची विक्री फ्लिपकार्ट आणि रियलमीच्या वेबसाईटवरून आज दुपारी 12.30 वाजता सुरु होईल. 

Realme C30 चे स्पेसिफिकेशन्स  

Realme C30 स्मार्टफोनमध्ये 6.5 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्याचे रिजोल्यूशन HD+ (1600x720 पिक्सल) आहे. प्रोसेसिंगसाठी यात Unisoc T612 चिपसेटची ताकद देण्यात आली आहे. फोनमध्ये 3GB पर्यंत रॅम आणि 32GB स्टोरेज आहे, जी 1TB पर्यंत वाढवण्यासाठी मायक्रोएसडी कार्ड स्लॉट मिळतो. हा स्वस्त रियलमी स्मार्टफोन अँड्रॉइड 11 आधारित Realme UI R एडिशनवर चालत.  

Realme C30 स्मार्टफोनमध्ये 5000mAh ची दमदार बॅटरी देण्यात आली आहे. या फोन सोबत 10W चा चार्जर दिला जाईल. सिंगल चार्जवर हा फोन 102 तास ऑडियो प्लेबॅक देतो, तसेच 45 दिवस स्टँडबाय टाइम मिळतो, असा दावा कंपनीनं केला आहे. स्मार्टफोनच्या मागे 8MP चा कॅमेरा सेन्सर आहे, जो 4X डिजिटल झूमला सपोर्ट करतो. फ्रंटला 5MP चा सेल्फी कॅमेरा आहे. 

Web Title: Realme c30 sale today in india on flipkart know price and specifications 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.