7 मार्चला लो बजेटमध्ये वादळ येणार; 5000mAh बॅटरी आणि शानदार कॅमेऱ्यासह Realme C35 घेणार एंट्री 

By सिद्धेश जाधव | Published: March 5, 2022 01:28 PM2022-03-05T13:28:56+5:302022-03-05T13:29:04+5:30

Realme C35 India Launch: 7 मार्चला Realme C35 हा फोन 50MP कॅमेरा, 5,000mAh बॅटरी, 4GB रॅम आणि Unisoc T616 चिपसेटसह भारतीयांच्या भेटीला येईल.

Realme C35 launch on March 7 in India with 50MP Camera 5000mah battery price sale specification  | 7 मार्चला लो बजेटमध्ये वादळ येणार; 5000mAh बॅटरी आणि शानदार कॅमेऱ्यासह Realme C35 घेणार एंट्री 

7 मार्चला लो बजेटमध्ये वादळ येणार; 5000mAh बॅटरी आणि शानदार कॅमेऱ्यासह Realme C35 घेणार एंट्री 

Next

Realme लो बजेट सेगमेंटमध्ये रेडमीला चांगली टक्कर देण्याची तयारी करत आहे. यासाठी कंपनी आपल्या ‘C’ सीरीजमध्ये Realme C35 स्मार्टफोन सादर करणार आहे. याआधी हा मॉडेल थायलंडमध्ये उतरवण्यात आला आहे. कंपनीनं आपल्या अधीकृत साईटवरून भारतीय लाँचची माहिती दिली आहे. 7 मार्चला हा फोन 50MP कॅमेरा, 5,000mAh बॅटरी, 4GB रॅम आणि Unisoc T616 चिपसेटसह भारतीयांच्या भेटीला येईल. दुपारी 12:30 PM वाजता या लाँच इव्हेंटचं थेट प्रक्षेपण कंपनीच्या साईटवर करण्यात येईल.  

Realme C35 चे स्पेसिफिकेशन्स 

रियलमी सी35 स्मार्टफोनमधील 6.6 इंचाचा फुलएचडी+ वॉटर ड्रॉप डिस्प्ले 2408 x 1080 पिक्सल रिजोल्यूशनला सपोर्ट करतो. यात 600निट्स ब्राईटनेस आणि 180हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेट देण्यात आला आहे. हा फोन अँड्रॉइड 11 बेस्ड रियलमी युआयच्या आर एडिशनवर चालतो. याला Unisoc T616 चिपसेटची प्रोसेसिंग पावर आणि एआरएम माली जी57 जीपीयू देण्यात आला आहे. सोबत 4GB RAM आणि 128GB पर्यंतची स्टोरेज मिळते. 

फोटोग्राफीसाठी या रियलमी फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. ज्यात एलईडी फ्लॅशसह 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, एक मॅक्रो लेन्स आणि एक ब्लॅक अँड व्हाईट लेन्स देण्यात आली आहे. फोनमधील फ्रंट कॅमेरा 8 मेगापिक्सलचा आहे. बेसिक कनेक्टिव्हिटीसह यात सिक्योरिटीसाठी साईड फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक फिचर मिळतं. तर पावर बॅकअपसाठी 5,000एमएएचची बॅटरी 18वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह देण्यात आली आहे. 

Realme C35 की किंमत  

थायलंडमध्ये रियलमी सी35 स्मार्टफोनच्या छोट्या 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत 5,799 THB (13,300 रुपये) आहे. तर मोठ्या 4 जीबी रॅमसह 128 जीबी इंटरनल स्टोरेज मॉडेलसाठी 6,299 THB म्हणजे जवळपास 14,500 रुपये मोजावे लागतील. भारतीय किंमत मात्र यापेक्षा वेगळी असू शकते.   

हे देखील वाचा:

Web Title: Realme C35 launch on March 7 in India with 50MP Camera 5000mah battery price sale specification 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.