Realme Flash असू शकतो मॅग्नेटिक वायरलेस चार्जिंग असलेला पहिला अँड्रॉइड स्मार्टफोन; टीजर आला समोर
By सिद्धेश जाधव | Published: July 27, 2021 12:51 PM2021-07-27T12:51:51+5:302021-07-27T12:53:29+5:30
Realme Flash MagdDart charging: Realme Flash हा पहिला अँड्रॉइड स्मार्टफोन असेल जो मॅग्नेटिक वायरलेस चार्जिंग टेक्नॉलॉजीसह सादर केला जाईल.
रियलमी आपला नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन Realme Flash टीज केला आहे. हा स्मार्टफोन लवकरच बाजारात दाखल होऊ शकतो. हा कंपनीचा पहिला वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करणारा स्मार्टफोन असेल, असे रियलमीने सांगितले आहे. कंपनीने या वायरलेस टेक्नॉलॉजीला MagDart हे नाव दिले आहे, हे नाव अॅप्पलच्या MagSafe सारखे वाटते. काही दिवसांपूर्वी रियलमीच्या वायरलेस चार्जर MagDart चे रेंडर समोर आले होते. तर आता GSMArena ने रियलमीच्या आगामी स्मार्टफोन Realme Flash ची माहिती आणि फोटो लीक केले आहेत.
MagDart चार्जिंग टेक्नॉलॉजी
Realme Flash हा पहिला अँड्रॉइड स्मार्टफोन असेल जो मॅग्नेटिक वायरलेस चार्जिंग टेक्नॉलॉजीसह सादर केला जाईल. GSMArena ने दिलेल्या माहितीनुसार, रियलमीचा MagDart चार्जर फोनच्या रियर पॅनलवर MagSafe चार्जरप्रमाणे चुंबकाच्या मदतीने चिटकून राहील. मोठ्या MagDart चार्जरमध्ये गर्मी कमी व्हावी म्हणून फॅन देखील देण्यात आला आहे. या MagDart चार्जरचा चार्जिंग स्पीड 15W असू शकतो.
Realme Flash चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स
Realme Flash चे काही स्पेसिफिकेशन्स लीक झाले आहेत. लीकनुसार, हा स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 888 चिपसेट आणि 12GB रॅमसह सादर केला जाईल. रियलमीचा हा फोन Android 11 वर आधारित Realme UI 2.0 वर चालेल. या फोनमध्ये 256GB ची इंटरनल स्टोरेज देण्यात येईल. Realme Flash ट्रिपल रियर कॅमेरा दिला जाऊ शकतो.